ETV Bharat / state

Mumbai Crime News : धक्कादायक! 6 कोटीचे अमली पदार्थ आणले सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून; युगांडाच्या दोन महिलांना अटक

Mumbai Crime News : मुंबईतून मोठी बातमी समोर आली असून महसूल गुप्तचर महासंचालनालय विभागानं (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी महिलांना अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे एका महिलेनं चक्क सॅनिटरी नॅपकीनमध्ये ड्रग्स लपवून मुंबईत आणले होते.

Mumbai Crime News
सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून आणले 6 कोटींचे ड्रग्ज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 9:50 AM IST

मुंबई Mumbai Crime News : सध्या राज्यभरात अमली पदार्थ तस्करी प्रकरणं चांगलेच गाजत आहेत. मुंबई, पुणे जिल्ह्यात यासंबंधित मोठी टोळी कार्यरत असल्याचं बोललं जात असून अनेक ठिकाणी अमली पदार्थच्या कारखान्यांवर छापा टाकण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा एकदा या संबंधित कारवाई करण्यात आलीये. महसूल गुप्तचर महासंचालनालय विभागानं (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोन युगांडाच्या महिलांना अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे एका महिलेनं चक्क सॅनिटरी नॅपकीनमध्ये अमली पदार्थ लपवून मुंबईत आणलं आहे.

सॅनिटरी पॅड्स आणि गुद्दाशयात लपवलं ड्रग्ज : अत्यंत सावधपणे नियोजित केलेल्या कारवाईत, डीआरआय मुंबई विभागाच्या अधिकार्‍यांनी दोन युगांडाच्या महिलांकडून अमली पदार्थांची तस्करी केल्याचा पर्दाफाश केला आहे. डीआरआयनं केलेल्या या कारवाईत आरोपी असलेल्या महिलांनी अमली पदार्थ तस्करी करताना वापरलेली आश्चर्यकारक मोडस ऑपरेंडी उघडकीस आली आहे. सॅनिटरी पॅड्स आणि गुद्दाशयात या महिला अमली पदार्थ लपवून आणत होत्या. यापूर्वी पर्दाफाश करण्यात आलेल्या सिंडिकेटमध्ये आरोपींनी अमली पदार्थ बॅगेत लपवणं किंवा अमली पदार्थ सेवन करुन पोटात लपवणं आदीसारख्या मोडस ऑपरेंडीचा वापर केला होता. मात्र यावेळी सॅनिटरी नॅपकिन्सच्या आत अमली पदार्थ लपविल्यानं नवीन मोडस ऑपरेंडी डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे.

तिन्ही महिला प्रवाशांना अटक : मागील तीन दिवसात केलेल्या कारवाईत, DRI मुंबई झोनल युनिटनं तीन प्रवाशांकडून एकूण 568 ग्रॅम कोकेन जप्त केलंय. ज्याची किंमत अंदाजे 5.68 कोटी रुपये इतकी आहे. सॅनिटरी पॅडमध्ये कोकेन लपवून ठेवलेल्या दोन ड्रग्ज तस्कर महिला या युगांडाच्या महिला होत्या. तिसरी प्रवासी ही टांझानियन महिला असून तिनं कोकेन असलेली कॅप्सूल गुदाशयात लपवून ठेवली होती. NDPS कायदा 1985 च्या तरतुदींनुसार अमली पदार्थ जप्त करण्यात आलं असून तिन्ही महिला प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Shirur Drugs Case : शिरुर तालुका बनलाय ड्रग्जचा अड्डा? फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; 174 किलो ड्रग्ज जप्त
  2. Sassoon Drugs Racket : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटीलचा भाऊ नेपाळ बॉर्डरहून ताब्यात
  3. Police Found With Drugs : आर्थर रोड कारागृहातील पोलिसाकडे सापडले चरस; ना म जोशी पोलिसांनी केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.