ETV Bharat / state

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी केली विदेशात अडकलेल्या तरुणीची सुटका

विदेशात अडकलेल्या एका २३ वर्षांच्या तरुणीची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सतत पाठपुरावा करुन सुटका केली. या तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Mumbai Crime News
विदेशात अडकलेल्या तरुणीची सुटका
author img

By

Published : Apr 13, 2023, 9:46 AM IST

मुंबई : विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या घटनांबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो, अशीच एक नवी घटना समोर आली आहे. या पीडित तरुणीला विदेशातून भारतात आणण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, एपीआय धनराज चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले होते, त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी गुन्हे शाखेचे आभार व्यक्त केले आहे. पिडीत तरुणी ही नॉर्थ गोव्याची रहिवाशी आहे. तिला सुरेशकुमार आणि कादर नावाच्या दोन एजंटने बेहरीनला नोकरीसाठी पाठविले होते. १७ फेब्रुवारी २०२३ ला बेहरीनला गेल्यानंतर तिला तिथे घरकामासाठी प्रवृत्त करण्यात आले होते.

मोबाईल चोरीचा खोटा आरोप : तिने घरकाम करण्यास नकार दिला होता. तयामुळे तिच्याविरुद्ध मोबाईल चोरीचा खोटा आरोप करुन पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. हा प्रकार तिच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी मुंबई पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती केली होती. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या युनिट दहाकडे संबंधित प्रकरण पाठवून दिले होते. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, एपीआय धनराज चौधरी यांनी संबंधित दोन्ही एजंटसह बेहरीन येथील भारतीय दूतावास कार्यालयातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून तिला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

मुंबई पोलिसांचे आभार : या अधिकार्‍यांनी बेहरीन येथील भारतीय नागरिक आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. सुनिल मांजरेकर, जयवंत पालेकर यांची मदत घेतली होती. त्यांनी या मुलीची सुटका करुन तिला भारतात पाठवून दिले होते. भारतात आल्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. या तरुणीचा विवाह ठरला असून लवकरच तिचे लग्न होणार आहे. त्यामुळे ती सुखरुप भारतात आल्याने तिच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे. कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे हे आवश्यक असते, हे या घटनेतून स्पष्ट होते.

हेही वाचा : Pune Crime News : प्रेयसीच्या घरी जाऊन पतीला मारहाण करत पिस्तूल रोखले...पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.