मुंबई : दिवसेंदिवस लैंगिक अत्याचार, बलात्कार, खून असे प्रकरणे वाढत चालले आहेत. 14 जूनला एका 20 वर्षीय महिलेवर चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या महिला डब्यात 40 वर्षीय पुरुषाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. घटनेच्या सुमारे 8 तासांनंतर आरोपीला अटक करण्यात आली, असे जीआरपी अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही महिला नवी मुंबईतील बेलापूरच्या दिशेने जात होती, जिथे तिची परिक्षा होती.
महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप : बुधवारी सकाळी ही महिला सीएसएमटी येथील हार्बर लाईन लोकल ट्रेनमध्ये चढली. ट्रेनने सुरू होताच, त्या वेळी रिकाम्या असलेल्या महिलांच्या डब्यात एक माणूस घुसला, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याने सकाळी साडेसातच्या सुमारास सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकांदरम्यान महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तो मस्जिद स्थानकावर (सीएसएमटी नंतरचे स्थानक) खाली उतरला, तेव्हा महिलेने अलार्म वाजवला होता, तोपर्यंत आरोपी पळून गेला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेज आधारे तपास : महिलेने जीआरपीकडे जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. जीआरपी, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ), गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांच्या पथकांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी मशीद स्थानकाच्या आत आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर त्याची ओळख पटली. दुपारी चारच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली, अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी हा रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमान्वये बलात्कारासह गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास सुरू आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा :