मुंबई Mumbai Crime : शुक्रवारी (8 डिसेंबर) मध्य रेल्वेच्या नागपूर पोलिसांना दोनविधीसंघर्षग्रस्त बालक चोरीच्या 82 मोबाईलसह राजधानी एक्सप्रेसनं प्रवास करीत असल्याची माहिती कांचीपुरम रेल्वे पोलिसांकडून मिळाली. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी शोध घेत दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना 82 मोबाईलसह ताब्यात घेतलं.
मोबाईल चोरून गाठली ट्रेन : यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल कुमार (वय 17, रा. शर्मा सराय,बिहार) आणि कृष्णकुमार (वय 16, रा. शर्मा सराय,बिहार) हे दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालक 82 मोबाईलची चोरून करुन कांचीपुरम तामिळनाडू राज्यातून राजधानी एक्सप्रेसमध्ये चढले.
गेल्या काही वर्षांत बालकांनी मोबाईल चोरी करून विकण्याच्या घटना वाढल्या आहेत. पालक आणि समाज यांनी सतत जागरूक राहिले पाहिजे. अन्यथा पिढी वाया जाईल.-संतोष शिंदे, बाल हक्क कार्यकर्ते
नागपूर रेल्वे पोलिसांनी केला तपास : नागपूर रेल्वे पोलीस दलातील एएसआय विठोबा मरस्कोळे यांच्या निदर्शनात रेल्वे पोलिसांनी राजधानी ट्रेनमध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकांचा तपास सुरू केला. तसंच सर्व रेल्वे स्थानकांवर या मुलांची माहिती देण्यात आली. मात्र, पोलीस आपला पाठलाग करताय याचा अंदाज येताच विधीसंघर्षग्रस्त बालक सातत्यानं रेल्वेचे डब्बे बदलण्यास सुरुवात केली. अखेर आमला रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेस थांबवण्यात आली.
मूळचे बिहार येथील विधीसंघर्षग्रस्त बालक कांचीपुरम तामिळनाडू येथून नागपूरकडे येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरून चढले. पोलिसांना गुंगारा देत काटोल जवळील 'आमला ' या रेल्वे स्थानकांवर अटक करण्यात आली. रेल्वे पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
दोघांना अटक : रेल्वे थांबल्यानंतर नागपूरच्या रेल्वे पोलीस दलातील उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार झडती घेण्यात आली. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालक सापडताच त्यांना चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलं. यावेळी दोघांकडं असलेल्या चार लेदरच्या बॅगांमध्ये 82 मोबाईल आढळले.
हेही वाचा -