ETV Bharat / state

मुंबईतील नालेसफाई, रस्ते कामांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी - mumbai news

पावसाळयापूर्वी कामे योग्य प्रकारे सुरू आहेत की नाही, याची पाहणी पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. यावेळी पालिकेचे अधिकारी त्यांच्यासोबत होते.

मुंबईतील नालेसफाई, रस्ते कामांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी

author img

By

Published : May 2, 2020, 8:20 PM IST

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून पालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करते. यावर्षी कोरोनाचे संकट असताना या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळयापूर्वी कामे योग्य प्रकारे सुरू आहेत की नाहीत, याची पाहणी पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. यावेळी पालिकेचे अधिकारी त्यांच्यासोबत होते.

मुंबईतील नालेसफाई, रस्ते कामांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी
मुंबईतील नालेसफाई, रस्ते कामांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी

मुंबईत दरवर्षी पावसाळयापूर्वी नालेसफाई व रस्त्यांची कामे केली जातात. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये व नागरिकांना चांगले रस्ते मिळावेत, रस्त्यांवर खड्डे पडू नयेत यासाठी ही कामे केली जातात. मात्र यावर्षी कोरोना विषाणूने मुंबईत थैमान घातले आहे. यामुळे या कामांना ब्रेक लागला होता. मात्र, पालिकेने अत्यावश्यक कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला. नालेसफाई आणि रस्ते बांधकामाची कामे योग्य प्रकारे सुरू आहेत की नाहीत, याची पाहणी पश्चिम उपनगरातील वांद्रे परिसरातून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलू रासू, सुधार समिती अध्यक्ष सदा परब, प्रभाग समिती अध्यक्ष एच पूर्व /एच पश्चिम चंद्रशेखर वायंगणकर, मुख्य अभियंता रस्ते संजय दराडे, प्रमुख अभियंता पर्जन्य जलवाहिनी संजय जाधव उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच महत्त्वाची कामे ठप्प आहेत. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत मान्सूनपूर्व कामांना वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामांव्यतिरिक्त अन्य कोणतेही प्रस्ताव घेऊ नयेत, असा निर्णयदेखील घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी गांभीर्याने करण्यात येत आहे. पावसाळी तयारीच्या दृष्टीने नालेसफाई आणि रस्ता कामे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मुंबईत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, भरतीच्या वेळा आणि शहराचे भौगोलिक स्थान यांचा विचार करता या कामांना प्राधान्य देण्यात येते. यावर्षीही ही कामे गतीने करण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.