मुंबई: रविवारी २३४ नवे रुग्णांची नोंद झाली आहे. ( Mumbai Corona Update ) आज १५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६२ हजार ९०८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४२ हजार ४०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२९४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४२०८ दिवस इतका आहे.
मुंबईत सध्या एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१६ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या २३४ रुग्णांपैकी २२६ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ५१० बेड्स असून त्यापैकी ४३ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत. मुंबईत पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती.