मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासात ९ हजार ५४१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४८६ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज २ मृत्यूंची नोंद झाली आहे. २८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २७ हजार ०८२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ४ हजार ८३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ५९१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २३२९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३० टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या वाढली: मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट
झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६ रुग्णांची नोंद झाली आहे.
११४ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात २ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा : Pratiksha Tondwalkar : सफाई कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर; वाचा प्रेरणादायी कहाणी