ETV Bharat / state

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचे पुन्हा ७६३ नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाचा प्रसार (spread of corona) वाढत आहे. गुरुवारी ७०४ नव्या रुग्णांची नोंद झाली होती शुक्रवारी त्यात वाढ झाली असुन नव्या रुग्णांचा आकडा 763 वर गेला (763 new corona patients) आहे. येथे सलग तीसऱ्या दिवशी 700 पेक्षा जास्त रुग्ण (More than 700 patients registered) नोंदवल्या गेले आहेत.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 3, 2022, 8:41 PM IST

मुंबई: मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट (wave of corona virus) आटोक्यात आल्यानंतर ५० च्या आत रुग्णसंख्या नोंदवली जात होती. मात्र त्यात गेल्या काही दिवसात वाढ पहायला मिळत आहे. ३१ मे ला ५०६, १ जूनला ७३९, २ जूनला ७०४ तर आज ३ जूनला ७६३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ३७३५ सक्रिय रुग्ण (Active Corona Patients) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मुंबईत आज शुक्रवारी ७६३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ३५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६८ हजार ००८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४४ हजार ७०६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३७३५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५७६ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०४३ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ७६३ रुग्णांपैकी ७२६ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४७३ बेड्स असून त्यापैकी १३६ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.

मुंबईत पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण नोंदवले गेले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली.तर १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३ रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा : Corona Update Mumbai : मुंबईत चौथ्या लाटेचा धोका, मास्क वापरा सामूहिक चाचण्या करण्याच्या सुचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.