ETV Bharat / state

BMC swimming Pool: उन्हाळ्यासाठी मुंबई पालिकेची जलतरण तलाव सज्ज

author img

By

Published : Feb 28, 2023, 10:59 PM IST

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात उन्हाळा वाढत आहे. उन्हाळ्यात नागरिक जलतरण तलावात किंवा वॉटर पार्कमध्ये जाण्याला प्राधान्य देतात. नागरिकांसाठी पालिकेने आपली जलतरण तलाव सज्ज ठेवली असून ऑनलाईन नोंदणी करून नागरिक या तलावांमध्ये पोहण्याचा आनंद घेऊन शकणार आहेत. इतर खासगी तलावांपेक्षा पालिकेच्या तलावाला प्राधान्य असल्याने त्यानुसार सदस्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

BMC swimming Pool
जलतरण तलाव

मुंबई: मुंबईमध्ये महापालिकेचे तसेच कामगार क्रीडा मंडळाचे जलतरण तलाव आहेत. महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये याआधी नागरिक मोठया संख्येने येत होते. त्यानंतर आलेल्या कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे ही तलावे बंद करण्यात आली होती. या तलावांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. पालिकेच्या दादर, चेंबूर, दहिसर, कांदिवली येथील जलतरण तलावात नोंदणी करण्यासाठी पालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. वार्षिक, त्रैमासिक, मासिक आणि दैनंदिन सदस्य बनवण्यात येत आहे.

इतके आहे शुल्क: जलतरण तलावाचा वापर करण्यासाठी वार्षिक ८ ते १० हजार, त्रैमासिक २२०० ते २९००, मासिक १३०० रुपये, तर दैनिक २५० रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. सदस्यांसोबत एखादा व्यक्ती पाहून म्हणून आल्यास त्याला २४० रुपये दैनिक शुल्क आहे. या तलावात सकाळी ६ ते ११, सायंकाळी ६ ते १०, महिला सदस्यांसाठी सकाळी ११ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ६ हा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. पूर्व सदस्यांना केवळ ४५ मिनिटे पोहता येत होते. आता या ६० मिनिटे पोहता येणार आहे.

लाईव्ह डॅशबोर्ड : पालिकेच्या जलतरण तलावात नेहमीच पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी असते. यामुळे इतरांना त्यावेळी पोहता येत नाही. त्यांना काही काळ वाट पाहावी लागते. यासाठी तलावात किती लोक आहेत याची संख्या ऑनलाईन मिळावी यासाठी लाईव्ह डॅशबोर्ड तयार केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना किंवा सदस्यांना आपण कोणत्या वेळेत पोहण्यास जावे याचा निर्णय घेता येणार आहे अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे उप आयुक्त किशोर गांधी यांनी दिली.

ही नवीन तलावे सुरु होणार: मुंबईकरांचा जलतरण तलावाकडे जास्त ओढा असल्याने पालिकेने दहिसर पश्चिम, मालाड पश्चिम, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, वरळी, विक्रोळी पूर्व, वडाळा या सात ठिकाणी नवे तलाव बांधण्याचे काम सुरु केले आहे. घाटकोपर येथील जलतरण तलाव बंद असून त्याची पुनर्बांधणी केले जाणार आहे. लवकरच ही तलावे नागरिकांसाठी खुली करण्याचा मानस असल्याचे गांधी यांनी सांगितले.

नागरिकांसाठी सुविधा : मुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. तेव्हापासून पालिकेची जलतरण तलाव बंद करण्यात आला होता. हा तलाव मागील वर्षी पुन्हा सुरु करण्यात आला. मात्र त्यानंतर नागरिकांना सभासद होऊन तलावाचा वापर करणे शक्य होत नव्हते. पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांना तलावांचा लाभ घेता यावा म्हणून ३ जानेवारीपासून त्रैमासिक, मासिक सदस्यत्व देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे जास्तीत जास्त मुंबईकरांना जलतरण तलावांचा आनंद घेता येणार आहे. तसेच डॅशबोर्डच्या माध्यमातून तलावात किती लोक आहेत हे सदस्यांना कळणार आहे. ते त्यांच्या वेळेनुसार तलावाचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती पालिकेचे उप आयुक्त किशोर गांधी यांनी दिली.

हेही वाचा: Threat Call : अमिताभ, धर्मेंद्र यांच्यासह मुकेश अंबानी यांचे बंगले बॉम्बने उडवणार; नागपूर पोलिसांना कॉल; मुंबई पोलीस अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.