मुंबई Mumbai police threat call - मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीनं फोन करत मोठा घातपात होणार असल्याची माहिती दिली आहे. हा कॉल २१ नोव्हेंबरला रात्री साडेनऊ वाजता आला.
मुंबईत मोठं कांड होणार अस अज्ञात व्यक्तीनं फोनवरील धमकीत वक्तव्य केलं आहे. हा फोन दक्षिण नियंत्रण कक्षाच्या लॅंडलाईनवर आला होता. समा नावाची महिला गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी आहे. या महिलेचा आसिफ नावाच्या काश्मिरी इसमाशी संपर्क आहे. ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरचा दावा आहे. अज्ञात व्यक्तीनं एटीएस अधिकारी आपल्याला ओळखत असल्याचाही दावा केला. समा आणि आसिफचे फोन नंबरदेखील त्यानं पोलिसांना कळविले आहेत. या धमकीची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
वानखेडे स्टेडिमयवर घातपात करण्याच्या धमकीचा कॉल- मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंडचा विश्वचषक स्पर्धेत सामना होण्यापूर्वीदेखील मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सतर्क राहून वानखेडे स्टेडियमच्या परिसारत कडक बंदोबस्त केला. पोलिसांनी तपास करत एक्स सोशल मीडियावरून धमकीचा मेसेज करणाऱ्या लातुरच्या तरुणाला अटक केली. आरोपीनं पोस्टमध्ये केलेल्या मेसेजसोबत बंदुक, हँडग्रेनेड आणि बंदुकीच्या गोळ्या दाखवल्यानं मुंबई पोलिसांनी धमकी गांभीर्यानं घेतली होती.
पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देणारा कॉल- यापूर्वी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चुनाभट्टी येथून कामरान अमिर खान नावाच्या तरुणाला मंगळवारी अटक करण्यात आली होती. जे जे रुग्णालयात चांगले उपचार मिळाले नाही, असा दावा करत कामराननं वैतागून नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन केला होता. त्याच्या कागदपत्राची तपासणी केली असता त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचं समोर आलं. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी आरोपी कामरान खानविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ५०५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला. अटक आरोपी कामरान हा बेरोजगार असून त्याच्या धमकीच्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
हेही वाचा-