ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाव गडगडले

author img

By

Published : Jun 18, 2021, 9:27 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेतमालाचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात गडगडले, बहुतांश शेतमाल हा कोरोनाचे सावट व दुसरी लाट येण्यापूर्वी अनेक ठिकाणी म्हणजेच स्टेशन गाव शहर पातळीवर विकला जायचा मात्र कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने त्याचा मोठा फटका हा शेतमालाला बसला. बाजारसमितीत हा माल मोठ्या प्रमाणावर आल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर भाव गडगडले.

Mumbai APMC prices fell
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाव गडगडले

नवी मुंबई - सर्वात मोठी बाजार समिती अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धान्य खरेदी-विक्री व इतर गोष्टींना चांगलाच ब्रेक लागला आहे. बाजार समितीमध्ये दिवसाकाठी फक्त ५० ते १०० क्विंटल धान्य खरेदी होते आहे. शिवाय मालाला देखील उचल नसल्याने शेतकरी व व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सिजनमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्याने किमतीवर परिणाम -

कोरोनाचा बाजारभावावर मोठा दूरगामी परिणाम -

लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर फळांचा व भाज्यांचा मोठ्या प्रमाणावर सिजन होता.देशभरातून नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे भाज्या कांदे बटाटे व इतर माल येतो, त्यामुळे याचा परिणाम मालाच्या किंमतीवर झाला. कोरोना काळाच्या पूर्वी ज्या मालाला ५० रुपये बाजार भाव मिळत होता. त्याला फक्त २० रुपये बाजार भाव मिळू लागला.

कोरोनामुळे शेतकरी व उत्पादकांचे नुकसान -

शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, मजूर व इतर गोष्टी यांना लागणारा खर्च पाहता, बाजारात मालाला उचल व किंमत न मिळाल्याने उत्पादक व शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सर्वांत मोठी बाजारपेठ बनली कोरोनाचे हॉटस्पॉट -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर जी होती ते एपीएमसी मार्केट परिसरात कार्यरत व्यापारी, माथाडी, मापाडी, कर्मचारी, ग्राहक, माल विक्रीसाठी येणारे शेतकरी होते. त्यामुळे ही रुग्णसंख्या पाहता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण व नेते ठिकाणांवरून माल घेण्यासाठी जो ग्राहक होता तो येणे कमी झाले व ग्राहक नसल्याने देखील मालाला हवा तसा उठाव मिळाला नाही.

कांदा बटाटा मार्केटमध्येही भाव गडगडले -

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जुन्नर व नाशिकमधून कांदा येतो. बटाटा युपी बिहारमधून येतो मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांची स्थिती डामाडौल असल्याने बाजारात कांदा बटाट्याला नीट उठाव मिळाला नाही.

बाजार समितीत मास्क स्क्रिनिंग सुरू केल्याने फायदा -

बाजार समितीत येणाऱ्या व्यापारी वर्गाची मास्क स्क्रीनिंग करणे अनिवार्य केल्यानंतर मात्र बाजार समितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली.व बाजारपेठेत ग्राहकांची आवक सुरू झाली बाजार भाव जरी मिळत नसला तरी किमती मात्र उत्पन्न कमी झाल्याने स्थिर आहेत.

हेही वाचा - ...म्हणून वाशी 'एपीएमसी'तील माथाडी कामगारांचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.