मुंबई: बॉलिवूडची धाकड अभिनेत्री कंगना राणौतला अंधेरतील न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. न्यायालयाने जावेद अख्तर खंडणी प्रकरणात सुनावणी करत कंगनाला सुनावले आहे. कंगनाने प्रख्यात गीतकार लेखक जावेद अख्तर यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात मुंबई न्यायालयाने त्या संदर्भात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत आरोप रद्द केले. एखाद्या व्यक्तीला लेखी माफी मागायला सांगणे, हे त्यांच्या सुरक्षेच्या व्याख्येत काही बसत नाही. तसे म्हणायला लावणे हे म्हणजे ते खंडणी मागणे नव्हे,असे म्हणत न्यायालयाने कंगना राणौतने दाखल केलेला गुन्हा रद्द केला.
न्यायालयाकडून आरोप रद्द : कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल आणि ऋतिक रोशन यांच्यामध्ये वाद होता. याप्रकरणात जावेद अख्तर मध्यस्थी करत होते. या दोघांच्या वादादरम्यान मार्च 2016 मध्ये जावेद अख्तर यांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना आपल्या घरी बोलावले. बहीण रंगोली चंदेल हिने हृतिक रोशनची माफी मागावी, अशी विनंती जावेद अख्तरत यांनी केली होती. त्यानंतर कंगना रानौतने जावेद अख्तर यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप करत खटला दाखल केला. त्या खटल्याप्रकरणी मुंबई न्यायालयाने सुनावणी देताना महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. 'एखाद्या व्यक्तीला माफी मागायला सांगणे, हे काही सुरक्षिततेच्या व्याख्येत येत नाही. त्यामुळेच ते काही खंडणीचा स्वरूप होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
कंगनाचे आणखीन आरोप : दरम्यान कंगना राणौत याचिका दाखल करताना म्हणाली होती की, जावेद अख्तर यांनी गुप्त हेतूने तिची बहीण आणि तिला मार्च 2016 मध्ये जुहू येथील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते. तसेच दोघांना गुन्हेगारी पद्धतीने धमकावले. जावेद अख्तर यांनी कंगनाबाबत बेताल वक्तव्य केले. त्यामुळे आपल्या नैतिक चारित्र्यावर हल्ला झाला. आपल्या नम्रतेचा अपमान झाला म्हणून याचिका दाखल केल्याचा कंगना रानौत म्हटले होते.
पुढील सुनावणी या तारखेला होणार: कंगना राणौतने या प्रकरणाच्या निमित्ताने एका सार्वजनिक मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी जाहीर केल्या होत्या. त्यात जावेद अख्तर यांच्यावर आरोप देखील तिने केला होते. त्या मुलाखतीच्या आधारेच जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात बदनामीची तक्रार दाखल केली होती. दरम्यान आज मुंबईच्या न्यायालयात कंगनाच्या बहिणीने खंडणी प्रकरणात आपली बाजू मांडली. अख्तर यांच्यासोबत झालेला संवाद सांगितला. दरम्यान अंधेरी न्यायालयातील न्यायदंडाधिकारी आर एम शेख यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचा गुन्हा आणि आरोप रद्द केला. कारण जावेद यांनी माफी मागायला सांगणे, हे खंडणीच्या स्वरूपात येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले. दंडाधिकाऱ्यांनी याबाबतची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी अंधेरी न्यायालयात होणार असल्याचे यावेळी सांगितले. त्यावेळेला अख्तर यांनी हजर राहणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
हेही वाचा -