मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडियन मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा विमानतळावर सतर्क झाल्या आहेत. त्यातच येत्या 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्या कारणाने देखील तपास यंत्रणा अधिकच सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी एका आरोपीला तांत्रिक पद्धतीने तपास करून अवघ्या काही तासांत अटक करण्यात आली आहे.
-
#UPDATE | Police arrested a 25-year-old man from Mumbai's Govandi area in connection with the threat call at the Chhatrapati Shivaji Maharaj International Airport: Mumbai Police https://t.co/DzWpZc4IRH
— ANI (@ANI) February 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | Police arrested a 25-year-old man from Mumbai's Govandi area in connection with the threat call at the Chhatrapati Shivaji Maharaj International Airport: Mumbai Police https://t.co/DzWpZc4IRH
— ANI (@ANI) February 7, 2023#UPDATE | Police arrested a 25-year-old man from Mumbai's Govandi area in connection with the threat call at the Chhatrapati Shivaji Maharaj International Airport: Mumbai Police https://t.co/DzWpZc4IRH
— ANI (@ANI) February 7, 2023
सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या : मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी विमानतळावर धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच विमानतळावरील सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईच्या पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ५०५(१) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
प्रमुख शहरांना सतर्कतेचा इशारा : चार दिवसांपूर्वीच मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. NIA या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ईमेल आयडीवर हा मेल आला होता. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मेलमध्ये तालिबानी नेत्याचा उल्लेख: NIA कडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षालाही गेल्या गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास हा मेल पाठवण्यात आला होता. यासह यंत्रणाना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेल करणाऱ्याने आपण तालिबानी असून तालिबानी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशावर चालत असल्याचा उल्लेख केला होता.
मुंबईकरांची चिंता वाढली : या मेलनंतर संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली होती. हा मेल कुठून आणि कुणी केला हा खोडसाळ प्रकार तर नाहीना, याचाही पोलीस शोध घेत आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानक यासह अनेक ठिकाणी तपासासोबत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. याआधी मागील महिन्यातही एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी बॉम्ब पेरल्याची धमकी दिली होती. यापूर्वी 2008 रोजी मुंबईवर 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला होता. यात पोलिसांसह नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणा 24 तास अलर्टवर असतात. पण, तरीही मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या मिळत असल्याने मुंबईकरांची चिंता वाढत आहे.