मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील एमसीपीएल इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून एका मनोरुग्ण युवकाने शनिवारी आत्महत्या केली. अक्षय राजवीर सारस्वत (३१) असे या मनोरुग्ण तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अक्षय हा उत्तरप्रदेशमधील गझियाबाद येथील प्रसाद विहार सेक्टर १२ मधील रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांपासून तो मानसिक दृष्ट्या तणावाखाली होता, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. २ दिवसांपूर्वी तो त्याच्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. त्याने त्याच्या कुटुंबियांना शनिवारी आपण मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर असल्याचे फोन करून सांगितले. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्यास घेण्यास विमानतळावर आले. मात्र, यादरम्यान त्याने इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली . त्याच्या बॅगेतून सुसाईड नोट मिळाली असून यात माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जवाबदार धरू नये, असे त्याने लिहिले आहे.