ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची डेडलाईन वाढवली - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची डेडलाईन वाढविण्यात आली आहे. 2022 साली पूर्ण करण्यात येणारा हा प्रकल्प आता 2023 ला पूर्ण करण्यात येईल.

मुंबई
author img

By

Published : Jul 6, 2019, 9:09 AM IST

Updated : Jul 6, 2019, 11:08 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची डेडलाईन शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात वाढविण्यात आली आहे. यामुळे 2022 साली पूर्ण करण्यात येणारा हा प्रकल्प 2023 ला पूर्ण करण्यात येईल, असे अर्थसंकल्पात नमूद केले आहे.

भारताच्या सुवर्णमध्य वर्षांत 2022 साली बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट होते. मात्र, या प्रकल्पासाठी पालघर, ठाणे परिसरात जमीन अधिग्रहण करण्यासाठी विलंब होत आहे. तर नवी मुंबई येथील खारफुटीची झाडे वाचवण्यासाठी नवी मुंबईतील बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल करण्यात येणार असल्याचे नुकतेच हा प्रकल्प राबवत असलेल्या हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केले. यासह विविध कारणांमुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एका वर्षाने वाढविण्यात आले आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासात पार पडेल. यामुळे प्रवासी वेळ वाचणार असून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. तसेच यामुळे दोन शहरांमधील प्रवासी अंतर कमी होण्यास मदत होईल.

Intro:मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची डेडलाईन आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात वाढविण्यात आली आहे. यामुळे 2022 साली पूर्ण करण्यात येणार हा प्रकल्प 2023 ला पूर्ण करण्यात येईल असे आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केले आहे.Body:भारताच्या सुवर्णमध्य वर्षांत 2022 साली बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट होते. मात्र या प्रकल्पासाठी पालघर, ठाणे परिसरात जमीन अधिग्रहण करण्यासाठी विलंब होत आहे. तर नवी मुंबई येथील खारफुटीची झाडं वाचवण्यासाठी नवी मुंबईतील बुलेट ट्रेनचा मार्गात बदल करण्यात येणार असल्याचे नुकतेच हा प्रकल्प राबवत असलेल्या हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकतेच जाहीर केले.Conclusion: या विविध कारणांमुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एक वर्षांनी वाढविण्यात आले आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे
मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासांत पार पडेल. यामुळे प्रवासी वेळ वाचणार असून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. तसेच यामुळे दोन शहरांमधील प्रवासी अंतर कमी होण्यास मदत होईल.
Last Updated : Jul 6, 2019, 11:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.