ETV Bharat / state

बेकायदेशीर वसुली करणाऱ्या क्लीन-अप मार्शल टोळीला मुलुंड पोलिसांनी केले जेरबंद

author img

By

Published : May 28, 2021, 9:27 AM IST

मुंबईमध्ये पुन्हा एकदा क्लिनअप मार्शलची लूट समोर आलेली आहे. ऐरोली टोल नाक्यावर पालिकेचे क्लिन अप मार्शल वाहन चालकांकडून तब्बल तीन ते चार हजार रुपये अनधिकृतपणे उकळत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी सूरज पांडे, निखिल कलकुथे, जितेंद्र दरवेशी, प्रवीण कारंडे,रोहन खराटे, दीपेश घोलप या क्लिन अप मार्शलसला बेड्या ठोकल्या आहेत.

Mulund police arrested a clean-up marshal gang
क्लीन-अप मार्शल टोळीला मुलुंड पोलिसांनी केले जेरबंद

मुंबई - मुलुंडच्या पूर्वेकडील जकात नाका परिसरामध्ये असलेल्या क्लीन-अप मार्शलकडून ट्रक चालकांची बेकायदेशीर लूट सुरू असल्याची तक्रार नवघर पोलिसांना मिळाली होती. अखेर या क्लीन-अप मार्शलला मुलुंड पोलिसांनी रंगेहात पकडून गजाआड केले आहे. मुंबई महानगरपालिकेने नेमलेले क्लीन-अप मार्शल अशाप्रकारे वाहनचालकांची लुट करत असल्यामुळे क्लिनअप मार्शलवर वचक ठेवणार तरी कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

क्लिनअप मार्शला बेड्या ठोकल्या -

मुंबईमध्ये पुन्हा एकदा क्लिनअप मार्शलकडून होणारी लूट समोर आलेली आहे. ऐरोली टोल नाक्यावर पालिकेचे क्लिन अप मार्शल वाहन चालकांकडून तब्बल तीन ते चार हजार रुपये अनधिकृतपणे उकळत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी सूरज पांडे, निखिल कलकुथे, जितेंद्र दरवेशी, प्रवीण कारंडे,रोहन खराटे, दीपेश घोलप या क्लिन अप मार्शलसला बेड्या ठोकल्या आहेत.

वारंवार क्लिन अप मार्शलची लूट समोर -

हे सर्व क्लिन अप मार्शल पालिका टी विभागाचे होते. गेले काही दिवस ऐरोली टोल नाक्यावर हे क्लिन अप मार्शल वाहन चालक आणि मुखतः ट्रक चालक यांना अडवत. त्यांना तुम्ही मावा, गुटखा खाऊन थुकला, मास्क नाही लावला वैगरे कारणे सांगून गाड्या थांबवत. नंतर त्यांच्याकडे टोळीने जाऊन तीन ते चार हजार उकळत असत. याबाबत एक नागरिकाने नवघर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी सापळा रचून या क्लिन अपच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र मुंबईत गेल्या काही दिवसात वारंवार क्लिन अप मार्शलची लूट समोर येत असल्याने पालिका या बाबत काय उपाययोजना करणार हे पाहणे गरजेचे आहे.

६ क्लीन-अप मार्शल पकडले -

खरंतर क्लीन-अप मार्शल हा पालिकेने दिलेला वेश परिधान करणे हे बंधनकारक असते. सोबतच क्लीन-अप मार्शलकडे पालिकेने दिलेले ओळख पत्र देखील असते. जर अशा पद्धतीने जर एखादा क्लीन-अप मार्शल एखाद्यावर दंड आकारात असेल तर ते कायदेशीर असते. परंतु अनेक वेळा क्लीन-अप मार्शल हे युनिफॉर्म न घालता परिसरांमध्ये फिरत असतात आणि दंड आकारत आहेत. त्यामुळे अनेकदा अनधिकृतरित्या देखील अशा पद्धतीने वसुली केली जात असते. त्यात आता हे जे ६ क्लीन-अप मार्शल पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडे पालिकेचे ओळखपत्र देखील मिळून आले आहेत.

तपास सुरू -

तक्रारदारांना कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ठाणे आणि आसपासच्या परिसरातून या सर्वांना बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी किती जणांना अशा पद्धतीने लुटले आहे. याचा तपास नवघर पोलीस करत आहेत. असल्याचे परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.

हेही वाचा - पोलीस मारहाण प्रकरण; व्हायरल व्हिडिओमुळे जालना जिल्हा निघाला ढवळून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.