मुंबई Mukesh Ambani Threat Case : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना 19 वर्षीय आरोपीनं ईमेल करून खळबळ उडवून दिली. 400 कोटी रुपयांची त्यांनी मागणी केली होती. तसंच त्यांनी अंबानी यांना मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर राजवीर जगतसिंग खंत (Rajvir Kant) यानं देखील ईमेलद्वारे धमकी दिल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 21 वर्षीय राजवीर खंत (Rajveer Khant) यानं पाकिस्तानी क्रिकेटपटू शादाब खानच्या नावानं ईमेल आयडी तयार केला होता. तसंच त्यानं अंबानी यांना धमकीचा मेल पाठवला असल्याचं मुंबई गुन्हे शाखेनं केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे. मुकेश अंबानी यांना वारंवार आलेल्या पाच मेलचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचा सायबर सेल, गुन्हे शाखा आणि गावदेवी पोलीस (Gavdevi police) वेगाने कामाला लागले होते. या तिघांनीही वेगाने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना तांत्रिक माहितीवरून अटक केली आहे.
जीवे मारण्याची दिली धमकी : गुजरात पोलिसातील हवालदाराचा मुलगा राजवीर खंत (Rajveer Khant) याला शनिवारी गांधीनगरमधील कलोल येथून अटक करण्यात आली. त्याने 27 ऑक्टोबरला पहिला ईमेल पाठवून अंबानींना 20 कोटी रुपयांची मागणी केली. तसंच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक क्रिकेट सामना सुरू असताना त्याने shadabkhan@mailfence हा आयडी तयार केला होता. त्यावेळी खान फलंदाजी करत होता आणि त्याने 46 धावा केल्या होत्या. असा मेल तयार करण्याची युक्ती क्रिकेट सामना पाहात असताना सुचली असल्याचं राजवीर खंतनं सांगितलं. त्यानंतर खानच्या नावाचा ईमेल आयडी तयार करण्याचा विचार केला.
व्हीपीएन नेटवर्कचा केला वापर : पोलिसांनी सांगितलं की, खंतनं डार्क वेबवर खूप वेळ शोधाशोध करण्यात घालवला. त्याला कळलं की, मेलफेन्स नावाच्या ईमेल प्रोव्हायडर कंपनीचा सर्व्हर बेल्जियममध्ये आहे. ही फर्म आपल्या ईमेल युझरची माहिती कोणाशीही शेअर करत नाही. खंतने आपलं ठिकाण लपवण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर केला होता.
अंबानींना पाच धमकीचे ईमेल पाठवले : ज्या दिवशी खंतकडून धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. त्या दिवशी देशभरातील 150 लोकांनी मेलफेन्सचा वापर केल्याचं गुन्हे शाखेला तपासात आढळून आलं. या सर्व युझर्सची छाननी करण्यात आली आणि अंबानींना आलेला ईमेल गांधीनगरहून आल्याचं उघड झालं. बीकॉमचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी असलेल्या खंतने मुकेश अंबानींना पाच धमकीचे ईमेल पाठवले होते. पहिल्या ईमेलमध्ये त्यानं 20 कोटी रुपयांची मागणी केली. दुसऱ्या ईमेलमध्ये ही मागणी 200 कोटी रुपये आणि नंतर 400 कोटी रुपये इतकी मागणी केली.
वनपारधीला तेलंगणातून केली अटक : दुसरा आरोपी, गणेश रमेश वनपारधी (वय 19) कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. त्याला अंबानींना जीवे मारण्याची धमकी आणि 500 कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तेलंगणातील वारंगल येथून अटक करून त्याला गावदेवी पोलिसांनी गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, वनपारधी याने अंबानींना ४०० कोटी रुपयांची मागणी करत धमकी मिळाल्याची बातमी एका वाहिनीवर पाहिली होती. तेव्हा त्यांनी ५०० कोटी रुपयांची मागणी करणारा ईमेल जीमेलद्वारे पाठवला. अटक केलेले दोन्ही आरोपी ८ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत.
हेही वाचा -
- Death Threat To Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या जीवाला खरंच धोका आहे का? 2021 पासून आजतागायत किती वेळा आल्या धमक्या?
- Mukesh Ambani Threat Case: मुकेश अंबानींना मेलवरुन वारंवार धमकी; आणखी एक आरोपी गुजरातमधून अटक
- Mukesh Ambani Threat Case : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या आरोपीला तेलंगाणातून अटक; आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी