मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीए)कडून मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात अनेक प्रकल्प राबवले जात असून महामार्ग, उड्डाणपूल, टोलनाके ही त्यांच्या अखत्यारीत येतात. अशावेळी पावसाळ्यात या प्रकल्पाच्या ठिकाणी पाणी साचण्यापासून ते इतर दुर्घटना घडतात. तेव्हा या दुर्घटना घडल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी एमएसआरडीसीने दरवर्षी प्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे.
तत्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष
पावसाळ्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी आणि नागरिकांना कोणतीही अडचण पावसामुळे आल्यास त्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 1 जूनपासून हा कक्ष कार्यरत झाला असून 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. हा नियंत्रण कक्ष राज्य सरकारच्या, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या नियंत्रण कक्षासह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाशी संलग्न असणार आहे.
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक
022-26517935/26420914
मोबाईल क्रमांक : 8850421579