ETV Bharat / state

'ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा धनादेशाऐवजी ऑनलाइन करावा' - महावितरण न्यूज

वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने ग्राहकांनी ऑनलाइन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MSEDCL appeal to people Pay electricity bills online in mumbai
'ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा धनादेशाऐवजी ऑनलाईन करावा'
author img

By

Published : Jul 12, 2020, 5:45 PM IST

मुंबई - सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा बँकेतील कामकाजावर परिणाम झाला आहे. वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी ऑनलाइन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग, वीजबिलांचे वाटप तसेच वीजबील भरणा केंद्र सुरू केले आहे.

जूनमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या अचूक वीजवापराचे मीटर रिडिंगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे. त्याबाबतचा संभ्रम दूर होऊन आता वीजबिल भरण्यास वेग आला आहे. ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटवला जाईल त्याच तारखेला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून प्रतिबंध क्षेत्रातील बँका बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटवण्यास उशीर होत आहे.

वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बील थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊन्स झाल्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी 750 रुपये दंडदेखील पुढील वीजबिलात लागू शकतो. यामुळे ग्राहकांना नाहक त्र꠰स सहन करावा लागू शकतो.

कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये धनादेश जमा करण्यासाठी बँका किंवा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाइन वीजबिलांचा भरणा करणे सोयीस्कर आहे. ग्राहकांनी धनादेशाऐवजी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाइनला प्राधान्य द्यावे. ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी महावितरण मोबाईल ॲप तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटचा वापर करावा. याशिवाय वीजबिलांवर महावितरणच्या बँकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस व एनईएफटीचा वापर करावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.