ETV Bharat / state

Swaminathan Passed Away: भारतीय हरितक्रांतीचे जनक हे बिरूद स्वामीनाथान यांनी व्रत म्हणून सांभाळले-एकनाथ शिंदे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 6:00 PM IST

Swaminathan Passed Away: भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारे स्वामीनाथान (Agronomist Dr MS Swaminathan) होते. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारे अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती. शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य (Death of Agronomist Swaminathan) वाहून घेतलेल्या महान सुपुत्र आज भारत मातेनं गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Tribute to Swaminathan)

Swaminathan Passed Away
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

मुंबई Swaminathan Passed Away: डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताची कृषी क्षेत्रातील, मृद व जलसंधारण क्षेत्रातील प्रगती ही डॉ. स्वामीनाथन यांच्या अखंड साधनेचे फलित आहे. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर भारताने अन्नधान्य स्वयंपूर्णता प्राप्त केली. डॉ. स्वामीनाथन यांनी शेतमजूर, शेतकरी ते कार्पोरेट फार्मिंग याविषयी त्यांनी मांडणी केली. भारतीय हरितक्रांतीचे जनक हे बिरूद त्यांनी अखंडपणे एक व्रत म्हणून सांभाळले. जागतिक स्तरावर डॉ. स्वामीनाथन ही आपल्या भारतीयांची एक महान बौद्धिक संपदा म्हणून पाहिले जात होते. अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राचे निधन झाल्यानं देशाचे मोठे नुकसान आहे.

  • भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना करीत त्यांनी गव्हाचे उच्च उत्पन्न देणारे बियाणे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

    स्वामीनाथन यांनी… pic.twitter.com/CpxrpZiprc

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शरद पवार यांची श्रद्धांजली: विशिष्ट क्षेत्रात कार्य करणार्‍या सुप्रसिद्ध व्यक्तींचं उल्लेखनीय काम त्यांच्या नावाशी कायमचं जोडले जाते. तसेच डॉ. स्वामिनाथन म्हणजे हरित कृषिक्रांतीचे जनकच. त्यांच्या कर्तृत्वाचा हा शिखरबिंदूच जणू, हे खरे असले तरी इतर अनेक क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांची कीर्तिकमान सतत उंचावत गेल्याचे प्रत्ययाला येते. डॉ. स्वामिनाथन म्हणजे एक उत्तुंग आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्वच. अशा विश्वव्यापी कार्याची ओळख असणाऱ्या स्वामिनाथन यांना भावपूर्ण वंदन, अशा शब्दात शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  • विशिष्ट क्षेत्रात कार्य करणार्‍या सुप्रसिद्ध व्यक्तींचे उल्लेखनीय काम त्यांच्या नावाशी कायमचं जोडले जाते. तसेच डॉ. स्वामिनाथन म्हणजे हरित कृषिक्रांतीचे जनकच, त्यांच्या कर्तृत्वाचा हा शिखरबिंदूच जणू, हे खरे असले तरी, इतर अनेक क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांची कीर्तिकमान… pic.twitter.com/tn9jEpB47P

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) September 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशाने सुपुत्र गमावला: प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम् एस् स्वामीनाथन् यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. डॉ. एम् एस् स्वामीनाथन यांनी भारताच्या कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून देशाला अन्नधान्यांच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनविले. त्यांच्या निधनामुळे देशाने कृषी क्षेत्रातील एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला.

  • प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम् एस् स्वामीनाथन् यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.

    — Governor of Maharashtra (@maha_governor) September 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अजित पवारांची श्रद्धांजली: भारताला अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या कपाळावरचा अन्न-धान्य टंचाईचा कलंक पुसून देशातील गरीब शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांच्या माध्यमातून अधिक उत्पादनाचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या निधनाने देशाच्या पहिल्या हरितक्रांतीचा जनक हरपला आहे, अशा शोकभावना व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  • भारताला अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या कपाळावरचा अन्न-धान्य टंचाईचा कलंक पुसून देशातील गरीब शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांच्या माध्यमातून अधिक उत्पादनाचा मूलमंत्र त्यांनी दिला.… pic.twitter.com/gW8B7OlnYS

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अन्नटंचाईच्या कलंकातून भारताची मुक्तता: उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हटले, डॉ. स्वामिनाथन यांनी भारतातील अल्पभूधारक, कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा शोध लावला. या संकरित वाणांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या पहिल्या हरितक्रांतीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील सहभागी करुन घेतले. तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात जन्मलेल्या डॉ. स्वामीनाथन यांचा सुरुवातीपासूनचं कृषी क्षेत्राकडे विशेष ओढा होता. त्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक संधी सोडून कृषी क्षेत्रातील मूलभूत संशोधनात त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

देशाच्या पहिल्या हरितक्रांतीच्या प्रणेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली- बटाटा, गहू, तांदूळ आणि तागावर संशोधन करुन अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा त्यांनी शोध लावला. केवळ संकरित वाणांची निर्मिती करून ते थांबले नाहीत तर सामान्य शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांनी संशोधन पोहोचवले. देशाच्या पहिल्या 'हरितक्रांती' कार्यक्रमात त्यांनी देशातील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यालाही जोडले. या हरितक्रांतीने भारताला जगातील अन्नटंचाई असलेला देश या कलंकातून मुक्तता मिळाली. त्यांचे निधन ही भारतीय कृषी क्षेत्राची मोठी हानी आहे. देशाच्या पहिल्या हरितक्रांतीच्या प्रणेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हेही वाचा-

  1. MS Swaminathan Passed Away : हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचं निधन, चेन्नईत घेतला 'अखेरचा श्वास'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.