ETV Bharat / state

MPSC Student Protest: नवीन अभ्यासक्रम 2025 पासूनचे परिपत्रक काढा; पुन्हा एकदा एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन - महाराष्ट्र लोकसेवा आयोग

मंत्रिमंडळ समितीने 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमासाठी विनंती प्रस्ताव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर केला आहे. मात्र त्यानंतर पंधरा दिवस उलटले. अद्यापही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार, अशी अधिकृत घोषणा केलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, असे नोटिफिकेशन काढायला हवे, अन्यथा आमचे आंदोलन सुरू राहील असा इशारा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. म्हणून आज पुन्हा त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

MPSC Student Protest
एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन
author img

By

Published : Feb 20, 2023, 12:49 PM IST

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील हजारो एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मागणी करूनही नोटिफिकेशन जारी केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे की, एमपीएससी ती घोषणा करत नाही, म्हणजे ते नवीन अभ्यासक्रम याच वर्षी लागू करतील. त्यामुळेच 2025 पासून नवीन अभ्यासक्रम लागू करावा, यासाठी ते आज पुन्हा आंदोलन करणार आहे. नवीन एमपीएससी अभ्यासक्रम 2025 पासूनचे नोटिफिकेशन जारी करा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धाकधूक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा वर्णनात्मक परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध नाही. फक्त त्यासाठी तयारी करायला पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, हे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्याचे कारण सर्व विद्यार्थ्यांनी जुन्याच अभ्यासक्रमानुसार सराव आणि तयारी केलेली आहे. त्यामुळे 2025 च्या आधी नवीन अभ्यासक्रम लागू करू नका. हे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. परंतु एमपीएससी ते घोषित करत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संवैधानिक सरकारी संस्था आहे, तर त्यांनी नोटिफिकेशन जारी केल्याशिवाय परीक्षा जुन्याच पॅटर्ननुसार होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.

नवीन अभ्यासक्रम लागू करण्याची भिती : एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 4 जून 2023 ला आहे. त्यात लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याने पूर्व परीक्षा पास होणे आव्हानात्मक असते. म्हणून पूर्व परिक्षेचा किमान 5-6 महिने अभ्यास गरजेचा आहे. अन्यथा पूर्व परीक्षाच पास नाही झाले, तर मुख्य कुठून देणार? मग यासाठी लागणारे 5 महिने हे एकूण कालावधीमधून वजा करावे लागतील. अशी त्यांची व्यथा विद्यार्थी मनोज पिंगळे यांनी बोलून दाखवली. ही येणारी परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार होईल, हे एमपीएससीने अधिकृत सांगावे अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे. नवीन अभ्यासक्रम एमपीएससीने 2025 ला लागू करत आहे, असे घोषित नसण्याचा अर्थ यावर्षी नवीन अभ्यासक्रम लागू होणार, ही विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे.

लिखित नोटिफिकेशन जारी करा : या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी राहुल कवठेकर यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले की, एमपीएससीने नोटिफिकेशन तात्काळ काढायला हवे, म्हणजे आम्हाला पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. तर दुसरे विद्यार्थी मनोज पिंगळे यांनी देखील या संदर्भात आपले मत व्यक्त केले की, जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग याबाबत लिखित नोटिफिकेशन जाहीर करत नाही, तोपर्यंत परीक्षा याच वर्षी नव्या पॅटर्नप्रमाणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आमचे हे आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा : Mumbai News: 'या' कारणामुळे तुरुंगामधील कैद्यांना फोनवरून बोलण्याची सुविधा; कारागृह महासंचालकाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.