ETV Bharat / state

Nana Patole : काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार? नाना पटोले म्हणाले, आमचा पक्ष... - Nana Patole on INDIA Mumbai Meeting

महाराष्ट्रात येत्या ३ सप्टेंबरपासून काँग्रेस पक्षाच्या वतीने 'जनसंवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. ही यात्रा राज्यातील सर्व खेड्यापाड्यात जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली. केंद्रातील आणि राज्यातील सरकार तोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला. तसंच शिवसेना-राष्ट्रवादीमधील बंडखोरांवर त्यांनी निशाणा साधलाय. तसेच काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे, याबाबत विचारलं असता पटोले यांनी खास शैलीत उत्तर दिलं. (Nana Patole on BJP) (Nana Patole on INDIA Mumbai Meeting) (Congress on INDIA Meeting Mumbai)

Mpcc Chief Nana Patole
नाना पटोले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 7:57 PM IST

Updated : Aug 26, 2023, 9:59 PM IST

प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पाडण्यात केंद्रातील भाजपा सरकारचा हात असल्याचा आरोप वारंवार महाविकास आघाडीकडून केले. शिवसेना पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्रातील सरकार हे राज्यातील सरकार तोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तर काँग्रेस पक्षातील कोणीही भाजपासोबत जाणार नसून, आमचा पक्ष कुत्र्या मांजरांचा नाही तर वाघाचा असल्याचा इशारा, नाना पटोले यांनी दिला. (Nana Patole on BJP) (Nana Patole on INDIA Mumbai Meeting) (Congress on INDIA Meeting Mumbai)

जनसंवाद यात्रेत बोलणार : येत्या ३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, गावात जनसंवाद यात्रा सुरू होणार आहे. कोकणात सर्वजण मिळून दौरा करणार आहेत. तसंच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाणार आहे. लोकशाही धोक्यात आणली, व्यवस्थेला संपवण्याचं काम, शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचं काम सरकारनं केलं. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग केला. सत्तेच्या भरवशावर सगळं मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ईडीचे, येड्याचे सरकार येऊन दीड वर्ष झालं. यावर आम्ही जनसंवाद यात्रेत बोलणार, असं नाना पटोले म्हणाले.

आमचा पक्ष वाघाचा : काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक शिंदे गट आणि काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, आमचा पक्ष कुत्रा-मांजरांचा नाही तर वाघाचा आहे. पेपरफुटी, विशिष्ट लोकांना नोकऱ्या, शेतकरी प्रश्न यावर ते बोलत नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलाय. राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांची यांनी दुरवस्था केली. या मुद्द्यांना दुर्लक्षित करून माध्यमांना अशा बातम्या द्यायच्या आणि विषयाला बगल देण्यासाठी अशाप्रकारे बोलले जाते. इतर पक्षात काँग्रेसकडून कोणीही जाणार नसल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.

Jansavand Yatra
जनसंवाद यात्रेसाठी कोण लीड करणार?

रश्मी शुक्ला प्रकरण : सत्तेच्या भरोशावर ते काहीही करू शकतात. रश्मी शुक्लांवर चौकशी सुरू झाली तेव्हा हे फोन टॅपिंग जाणीवपूर्वक केलं असे गुन्हे दाखल झाले. एकनाथ शिंदेंच्या सरकारात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला. मग हे प्रकरण सीबीआयला देण्यात आलं. आता वॉशिंग मशीनमध्ये सगळं धुतलं जातं. आज ना उद्या फाईल उघडणार. ही फाईल भविष्यात आम्ही उघडू. तसेच प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे. सत्तेतील नेतेही सगळं एकीकडे एकत्र नसतात. सत्यजित तांबे यांच्या परत येण्याबाबतचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस प्रदेश कार्यालयाला राहुल गांधी भेट देणार : 'इंडिया' आघाडीच्या निमित्ताने राहुल गांधी मुंबईत येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं जाईल. मुंबई काँग्रेस प्रदेश कार्यालयाला देखील राहुल गांधी भेट देणार आहेत. ग्रँड हायात ते प्रदेश कार्यालयापर्यंत त्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत केलं जाणार आहे. तर सत्ताधाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा इतर निवडणूक यांना खात्री नाही की, ते जिंकतील म्हणून निवडणुका दीड वर्ष झाल्या नाहीत. काहीतरी कारण सांगून प्रकरण कोर्टात ठेवायचं, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी भाजपावर केला.

राहुल गांधी मुंबईत येणार : 'इंडिया' आघाडीच्या २ मोठ्या बैठका झाल्या. आता तिसरी मोठी बैठक मुंबईत होणार आहे. याची जय्यत तयारी सुरूये. बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी येण्याची शक्यता आहे. ३१ तारखेला सायंकाळी INDIA च्या लोगोचं अनावरण होणार आहे. १ तारखेला सकाळी महत्वपूर्ण चर्चेसाठी बैठक होणार आहे. इंडिया बैठकीचा संदेश देशात जाणारच असल्याचे चव्हाण म्हणाले.

ऑगस्ट महिना पूर्णपणे बिगर पावसाचा गेला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. याला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, फडणवीस स्वतः म्हणत होते मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार पण येऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. बावनकुळे काही म्हणो, 'इंडिया' बैठकीसाठी जय्यत तयारी सुरू केली, जनसंवाद यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. ३ तारखेपासून १३ पर्यंत ही यात्रा चालेल. ऑगस्ट महिना पूर्णपणे बिगर पावसाचा गेला, काही उत्पादन होणार नाही. चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी हालाखीच्या परिस्थितीत आहे. अशा वेळेस शासन कुठे आहे? असा प्रश्न थोरात यांनी शिंदे सरकारला विचारला.

हेही वाचा -

  1. Nana Patole On Onion Price : कांद्यावरून राजकारण तापले; शेतकऱ्यांची थट्टा खपवून घेतली जाणार नाही - नाना पटोले
  2. Jansavand Yatra : मोदी सरकारने देशाची माती केली - नाना पटोले
  3. Nana Patole On Modi : लाल किल्ल्यावरून तरी खोटे बोलू नका, नाना पटोलेंचा मोदींना टोला

Last Updated : Aug 26, 2023, 9:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.