ETV Bharat / state

MP Supriya Sule : 25 वर्षांच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 19 वर्षे सत्तेत राहिला - सुप्रिया सुळे - सुप्रिया सुळेंचे मार्गदर्शन

राज्यातील 25 वर्षांच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 19 वर्षे सत्तेत राहिला, असे मत पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. पक्ष 24 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाबाहेर वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या मागील काळातील वाटचालीची माहिती दिली.

MP Supriya Sule
सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jun 10, 2023, 6:28 PM IST

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. 24 वर्षांपूर्वीचा शिवाजी पार्कचा दिवस आठवतो. गुरुनाथ कुलकर्णी आणि आर. आर. पाटील यांची आवर्जून आठवण येत आहे. नवाब मलिक हे आज कार्यक्रमाला नाहीत. पण पुढच्या वर्षी ते नक्कीच उपस्थित असतील. युपीए सरकारमध्ये 10 वर्षे सत्तेत असताना शरद पवारांनी कृषी मंत्री पद सांभाळत देशात क्रांती केली. प्रफुल पटेल यांनी पक्ष वाढवला. आज राज्यात काय परिस्थिती आहे हे माहीत आहे. जेव्हा जेव्हा सरकार चुकते तेव्हा विरोधी पक्ष त्यांना चुकल्याची आठवण करून देतो.

दिल्लीतील कार्यालयात बैठक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. मुंबई, पुणे राज्यातील इतर राष्ट्रवादी कार्यालय बाहेर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्ली येथील कार्यालयात बोलवण्यात आली आहे. बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, अजित पवार यांच्यासह कार्यकारणीतील महत्त्वाचे नेते देखील उपस्थित असणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळली.

विरोधकांनी गाठली खालची पातळी : राकॉंने स्थापनेपासून देशात आणि राज्यात नेतृत्वाची कामगिरी बजावली आहे. आपल्या पक्षाने सामाजिक आर्थिक बदलासाठी काम केले. गेल्या काही दिवसात विरोधकांनी खालची पातळी गाठली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार आहेत. निवडणुका जवळ आल्याने देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, त्याला सत्ताधारी पायबंद घालत नसल्याची खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

सतर्क राहणे गरजेचे : राज्यात जातीय दंगे होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काम करणार आहे. सध्या पोलीस विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाही करत आहेत. शरद पवारांनी न केलेले वक्तव्य एक चॅनेलने दाखवले. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक झाल्यावर राज्यभरात लाडू वाटूया, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा:

  1. Jayant Patil On Ajit Pawar : अजित पवारांवर कोणताही अन्याय नाही; घराणेशाहीला राष्ट्रवादीत नाही थारा - जयंत पाटील
  2. Amit Shah Rally In Nanded : गृहमंत्री अमित शाह अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला लावणार सुरुंग; केसी चंद्रशेखर रावांना देणार धक्का ?
  3. Sharad Pawar On Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचे टार्गेट लोकसभा निवडणूक 2024, पक्षातील 'या' नेत्यांच्या खांद्यावर टाकली जबाबदारी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.