ETV Bharat / state

'निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये मोठे नुकसान, केंद्र सरकारने पश्चिम बंगालप्रमाणे मदत जाहीर करावी' - निसर्ग चक्रीवादळाचा रायगडवर परिणाम

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारच्या सुमारास अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनारी धडकले. यामुळे रायगड जिल्ह्यात दोघांचा मृत्यू देखील झाला. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी खासदार सुनिल तटकरे रायगड जिल्ह्याला पाहणी करत आहेत.

MP sunil tatkare latest news  nisarga cyclone effect on raigad  nisarga cyclone effect  निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम  निसर्ग चक्रीवादळाचा रायगडवर परिणाम  खासदार सुनील तटकरेंची मागणी
खासदार सुनील तटकरे
author img

By

Published : Jun 4, 2020, 5:39 PM IST

Updated : Jun 4, 2020, 6:06 PM IST

मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच झाडांची पडझड झाली आहे. जनजीवन पूर्ण उद्ध्वस्त झाले. मच्छीमार, गणपती मूर्तीकार, फळबागा, घरांचे नुकसान झाले. तिरडीचा हंगाम सुरू झाला होता. आता शेतकरी तिरडीला जाणार की, घरचे नुकसान पाहणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पश्चिम बंगालप्रमाणे लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.

'निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये मोठे नुकसान, केंद्र सरकारने पश्चिम बंगालप्रमाणे मदत जाहीर करावी'

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारच्या सुमारास अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनारी धडकले. यामुळे रायगड जिल्ह्यात दोघांचा मृत्यू देखील झाला. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी खासदार सुनील तटकरे रायगड जिल्ह्याला पाहणी करत आहेत.

रायगडमध्ये विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे. जिल्ह्यातील नुकसानीबाबत शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. त्यामध्ये झालेल्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. एका-एका गावाचे पंचनामे करावे. तसेच मदतीची पॅकेज देण्याची मागणी केली असल्याचे तटकरे म्हणाले.

पंतप्रधानांना देखील याबाबत निवेदन देऊन पश्चिम बंगालप्रमाणे पॅकेज घोषित करण्याची मागणी करावी, अशी विनंती शरद पवार यांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jun 4, 2020, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.