ETV Bharat / state

Mumbai Covid Scam : काही दिवसातच संजय राऊत कारागृहात - नितेश राणे - कोव्हीड सेंटर उभारण्याच्या कंत्राट नियमबाह्य

मुंबईतील कोव्हिड घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना इडीकडून अटक करण्यात आली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी मुंबईत कोव्हिड सेंटर उभारण्याच्या कंत्राट नियमबाह्य देण्याचा आरोप केला होता. त्यावर सुजित पाटकर म्हणजेच संजय राऊत असून राऊत जास्त दिवस जेलबाहेर राहू शकणार नाही, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.

Nitesh Rane
Nitesh Rane
author img

By

Published : Jul 20, 2023, 5:18 PM IST

मुंबई : मुंबई कोव्हिड घोटाळ्यासंदर्भात मोठी कारवाई करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना ईडीने अटक केली आहे. मुंबईत कोविड सेंटर उभारण्याचे कंत्राट बेकायदेशीरपणे देण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. भाजप नेते किरीट सोमैया यांनी याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. यावर भाजप आमदार नतेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत असून संजय राऊत जास्त काळ तुरुंगाबाहेर राहू शकणार नाहीत, असे टीकास्त्र नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर सोडले आहे.

संजय राऊतांचे काळ धंदे : सुजित पाटकर यांना कोव्हिड प्रकरणात अटक करण्यात आली आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. सुजित पाटकर नक्की कोण आहेत? संजय राऊत यांच्या सर्व व्यवहारांची, काळ्या धंद्याची माहिती पाटकरकडे आहे. संजय राऊतांचे काळ धंदे चालवण्यासाठी सुजित पाटकर यांना पुढे केले जाते, असा खळबळजनक आरोप देखील नितेश राणे यांनी केला आहे. वास्तविक या सगळ्याचा कर्ता करविता धनी वेगळाच आहे. तो संजय राऊतच असल्याचा एकप्रकारे पुनरुच्चारच राणे यांनी केला आहे.

संजय राऊत कारागृहात दिसणार : सुजित पाटकर यांच्या अटकेचा अर्थ म्हणजे संजय राऊत फार दिवस बाहेर राहणार नसल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत लवकरच आर्थर रोड कारागृहात तुम्हाला दिसतील. रोज आमच्या पक्षावर संजय राऊत भ्रष्टाचाराचे आरोप करतात, इतरांवरही भ्रष्टाचाराचे आरोप करतात, मात्र स्वत: भ्रष्टाचारात बुडालेल्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे आता कारागृहात जाण्याचे दिवस आले आहेत. सकाळपासून मी संजय राऊतांना कुठेच पाहिले नाही. संजय राऊत वेश धारण करून फरार होऊ शकतात, अशी टीका राणे यांनी केली आहे. सुजित पाटकर यांची अटक म्हणजे संजय राऊत यांच्यासाठी उलटी गिनती सुरू झाल्याचे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Sanjay Raut criticized Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांचे किती विठ्ठल आहेत? संजय राऊत यांचा खोचक प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.