ETV Bharat / state

Sanjay Raut : स्वातंत्र्य सेनानी कुठल्याही पार्टीचे नाहीत; संजय राऊत यांचा सावरकरांच्या वंशजांना सल्ला - MP Sanjay Raut has reacted to ongoing controversy

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Congress leader Rahul Gandhi) भारत जोडो यात्रे (Bharat Jodo Yatra) दरम्यान स्वा. सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आणखी राजकारण तापवतांना दिसत आहे. तर, या सर्व प्रकरणावर (reacted to ongoing controversy) शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

MP Sanjay Raut
संजय राऊत यांचा सावरकरांच्या वंशांना सल्ला
author img

By

Published : Nov 19, 2022, 1:24 PM IST

Updated : Nov 19, 2022, 4:35 PM IST

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आल्यावर, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादात (reacted to ongoing controversy) सापडली आहे. राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता भाजपने देखील जवाहरलाल नेहरू यांना माफीवीर म्हणायला सुरुवात केली आहे. रणजीत सावरकरयांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिक्रिया देतांना खासदार संजय राऊत

वीर सावरकर हे वंदनीय : सकाळी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'वीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कोणी काय सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये प्रत्येकाचे एक वेगळे स्थान आहे. आमच्यासाठी वीर सावरकर हे वंदनीय आहेत आणि प्रिय आहेत. ज्या लोकांनी या देशासाठी आपल्या सुखाचा त्याग केला, या सगळ्या लोकांसाठी देशामध्ये आदर आणि निष्ठा आहे आणि पुढेही राहणार, हे स्वातंत्र्य सेनानी कुठल्याही पार्टीचे नाही, परंतु एक विचारधाराचे आहे, हे सगळ्यांना माहित असले पाहिजे, आता हे स्वातंत्र्य सेनानी जीवित नाही, परंतु कोणीही या महान पुरुषां विरोधात अशी टिप्पणी केली नाही पाहिजे.'

ही आपली परंपरा नाही : पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, 'पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, लालबहादूर शास्त्री या सगळ्यांचे योगदान आहे. कोणी वीर सावरकरांवर प्रश्न निर्माण केले, म्हणून पंडित नेहरूवर प्रश्न निर्माण करायचे, हे निदान स्वतःला सावरकरांचे वंशज समजणाऱ्या लोकांनी तरी थांबवले पाहिजे. ही आपली परंपरा नाही आणि आम्ही सर्व सावरकरांसाठी लढाई करत आहोत. या देशाचे स्वातंत्र्य घडवण्यास आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यास, हा देश विकासाच्या वाट्यात पुढे नेण्यात, पंडित नेहरू यांचे मोठे योगदान आहे.'

देश नेहरूंचा ऋणी : 'आपण म्हणतो की जर सावरकर विज्ञान निष्ठ होते, तर त्या विज्ञान निष्ठेच्या दिशेने देशाला नेण्याचे काम हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले आहे. नाहीतर या हिंदुस्तानच पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची अवस्था आहे, नेहरूंनी ते होऊ दिले नाही, म्हणून हा देश नेहरूंचा ऋणी आहे', अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना दिली.

Last Updated : Nov 19, 2022, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.