ETV Bharat / state

'बाळासाहेबांमुळेच भाजपा गावागावात पोहचली' - संजय राऊत भाजपा अस्तित्व मत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही आज (२३ जानेवारी) ९५वी जयंती आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यात भाजपाच्या अस्तित्वाचे श्रेयही राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिले आहे.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Jan 23, 2021, 12:37 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील भाजपाच्या अस्तित्वाचे श्रेय हे बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. बाळासाहेबांनी राज्यात हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेबांमुळेच गावागावात भाजपा पोहचली आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

राज्यात भाजपाच्या अस्तित्वाचे श्रेय बाळासाहेब ठाकरेंना देताना संजय राऊत

जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही आज (२३ जानेवारी) ९५वी जयंती आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांसारखे नेते हे शतकातून एकदाच निर्माण होतात. बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली. हिंदुत्वाची जी लाट निर्माण झाली, त्याचे श्रेय हे बाळासाहेब ठाकरे यांनाच दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी छातीवर अनेक घाव झेलले आहेत. आमच्यासारखे लोक त्यांच्या प्रेरणेने उभे राहिली आहेत. महाराष्ट्रामध्ये आज भाजपा आहे, त्याचे श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना जाते, असे राऊत यांनी सांगितले.

राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज राज्यभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. शिवसेनेसह विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना योद्धयांचा सन्मान, आरोग्य तपासणी शिबीर, अवयवदान शिबीर, रुग्णांना फळवाटप, ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे सावट अजूनही कायम असल्यामुळे शिवसैनिकांकडून मास्क देखील वाटण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.