मुंबई : महाराष्ट्रात गाजलेला आणि कथित पत्राचाळ गृहनिर्माण प्रकल्पामध्ये घोटाळ्यात ईडीने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप केला गेला होता. तसेच त्यासोबत मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्यावर देखील घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याप्रकरणी ईडीकडून खासदार राऊतांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, मुंबईच्या सत्र न्यायालयाकडून संजय राऊत त्यांना जामीन मिळाला होता. परंतु त्यानंतरही मुख्य आरोपी प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांना सत्र न्यायालयामध्ये ठराविक दिवसांनी हजेरी लावणे बंधनकारक केले आहे. आज हजेरीच्या दरम्यान संजय राऊत यांच्या वकिलांनी पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला.
राऊतांचा पासपोर्टसाठी अर्ज : कथित पत्राचा गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. संजय राऊत यांना ज्यावेळेला मुंबईच्या सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी पुरावे आणि तथ्य यावर आधारित जामीन दिला आहे. तेव्हा त्यांनी सशर्त जामीन दिला होता. त्यांना जामीन जरी मिळाला तरी अद्याप प्रकरण पूर्णतः संपलेले नाही. त्यामध्ये देशात आणि देशाबाहेर संजय राऊत यांना जर जायचे असेल तर त्यासाठी त्यांना स्पष्ट स्वरूपात अनुमती न्यायालयाकडे मागावी लागेल. त्यामुळेच आता संजय राऊत यांनी न्यायालयामध्ये पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला आहे.
संजय राऊत जामीनावर : संजय राऊत यांना त्यावेळेलाच सुनावणी दरम्यान सशर्त जामीन न्यायालयाने मंजूर केला होता. कोणत्याही स्थितीमध्ये देशात किंवा विदेशात संजय राऊत यांना जायचे असेल तर न्यायालयापुढे त्यांनी अर्ज सादर करायला हवा. सत्र न्यायालय त्या अर्जावर विचार करेल आणि मगच त्याबाबत अंतिम निर्णय केला जाईल. त्यामुळे ही प्रक्रिया पार पाडल्याशिवाय खासदार संजय राऊत यांना तसा प्रवास करता येणार नाही.
न्यायालयाची ईडीला विचारणा : संजय राऊत यांचा देशात आणि देशाबाहेर ते खासदार असल्यामुळे त्यांना विविध कामासाठी जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून त्यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यासमोर अनुमती अर्ज सादर केला. या अनुमती अर्जावर अंमलबजावणी संचलनालय यांचे काय म्हणणे त्याबाबत न्यायालयाने ईडीला देखील विचारले. यावेळी न्यायालयाने इतर सह आरोपीच्या हजेरीबाबत देखील विचारणा केली. कारण यासोबत इतर मुख्य आरोपी आणि सह आरोपी आज हजेरीसाठी उपस्थित नव्हते.
ईडीने मांडली बाजू : खासदार संजय राऊत यांनी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला याबाबत विचारणा केली. यावर अंमलबजावणी संचलनालय यांच्यावतीने अधिवक्ता कविता पाटील यांनी याबाबत सांगितले की, आमच्याकडून स्वतंत्र अर्ज केला जाईल. यामध्ये आपले स्पष्टीकरण न्यायालयात मांडणार आहे.
हेही वाचा : Sanjay Raut News: मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे भेटीवरून संजय राऊत म्हणाले, 'सदू आणि मधू दोघे भेटले...,'