ETV Bharat / state

MP Sanjay Raut : हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रावरचे हल्ले वाढत चाललेले - सीमावादावर संजय राऊत यांचा गंभीर आरोप

कर्नाटकच्या बेळगावी न्यायालयाने सोमवारी राज्यसभा सदस्य संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना समन्स बजावले आहे. या संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी आपण कर्नाटकच्या बेळगाव न्यायालयात हजेरी लावणार असल्याचे सांगितले आहे. ते आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत (allegation on Karnataka Maharashtra Borderism) होते.

MP Sanjay Raut
सीमावादावर संजय राऊत यांचा गंभीर आरोप
author img

By

Published : Nov 29, 2022, 1:02 PM IST

मुंबई : कर्नाटकच्या बेळगावी न्यायालयाने सोमवारी राज्यसभा सदस्य संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना समन्स बजावले आहे. त्यांना १ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 30 मार्च 2018 रोजी बेळगावमध्ये दिलेल्या भाषणासंदर्भात संजय राऊत यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. या संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी आपण कर्नाटकच्या बेळगाव न्यायालयात हजेरी लावणार असल्याचे सांगितले आहे. ते आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत (allegation on Karnataka Maharashtra Borderism) होते.

सीमावादावर संजय राऊत यांचा गंभीर आरोप

सरकारचा छुपा पाठिंबा : कर्नाटक राज्याचे ध्वज महाराष्ट्रात फडगवण्यात आले आहेत. या विषयावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, त्यांनी ध्वज फडकवले. यावर मला काय वाटते हे बघण्यापेक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना काय वाटते? सरकारला काय वाटते. हे त्यांना विचारायला हवे. मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई हे याच प्रश्नावर कर्नाटकला जाणार असल्याचे मी वर्तमानपत्रांमध्ये वाचले. तिकडे जाऊन हे दोन मंत्री नेमके काय करणार आहेत? कुणाला भेटणार आहेत? हे त्यांनी जाहीर करायला हवे. कर्नाटकचे कार्यकर्ते महाराष्ट्रात येऊन त्यांचे झेंडे फडकवतात. कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे लोक अशी कृत्य करू शकत नाहीत. सोबतच महाराष्ट्राच्या सरकारमधील नेत्यांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय देखील हे शक्य नाही. यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली (MP Sanjay Raut allegation) पाहिजे.

त्यासाठी पुन्हा आसामला जाणार का? पुढे बोलताना राऊत म्हणले की, महाराष्ट्रात घुसलेले कर्नाटकी लोक परत जाण्यासाठी किंवा कर्नाटकशी लढण्यासाठी आपले मुख्यमंत्री परत आसामला जाऊन प्रार्थना करणार आहेत की काय? ज्या सरकारला महाराष्ट्राचा अभिमान नाही, त्या सरकारकडून महाराष्ट्राचा संरक्षण होणार नाही. आमच्या काश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तींनी झेंडे फडकवावे व काश्मीर आमचा आहे, म्हणावे अशा पद्धतीने हे महाराष्ट्रात घुसलेले आहेत. अशा लोकांच्या विरोधात राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावे. 2018 मध्ये केलेल्या विधानावरती आता गुन्हा दाखल करत आहेत, पण नोटीस पाठवत आहे. यावर देखील सरकारने भूमिका स्पष्ट करावी. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत. अशी टीका राऊत यांनी केली (Sanjay Raut allegation on Borderism) आहे.

काश्मीर फाईल्स प्रोपौगंडा : गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कश्मीर फाईल्स या चित्रपटावर चित्रपट समीक्षकांनी टीका केली. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, काश्मीर फाईल्स या चित्रपटात एका पक्षाचा प्रचार दिसतोय व त्यामध्ये एका पक्षाची बाजू घेतलेली आहे. या चित्रपटानंतर कश्मीरमध्ये सर्वात जास्त पंडितांवर हल्ले झालेले आहेत. केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर असे राजकारण करू (Karnataka Maharashtra Borderism) नये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.