मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच जामीनावर बाहेर आलेले शिवसेनेचे फायर ब्रँड नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचा आज 63 वा वाढदिवस (MP Sanjay Raut 63rd birthday) आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांच्या भांडुपमधील मैत्री या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली (Sanjay Raut birthday hoardings decorate streets) आहे. संजय राऊत देखील शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारत असून, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणलेला पुष्पगुच्छ स्वतः स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रमधून कार्यकर्ते भांडुपमध्ये आले आहेत. आज सेलिब्रिटी पॉलिटिशन असलेल्या संजय राऊत यांचा प्रवास देखील तितकाच रोमांचक(birthday hoardings decorate streets in Bhandup) आहे.
राऊतांना शिवसेनेत महत्वाचे स्थान : संजय राऊत हे सध्या राज्यसभेचे खासदार असून ते शिवसेना या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. संजय राऊत यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात लेखक आणि क्राईम बीट पत्रकार म्हणून केली, ज्यामध्ये ते यशस्वी झाले. संजय राऊत यांनी आत्तापर्यंत 9 पुस्तके लिहिली असून त्यांचे शेवटचे पुस्तक 2013 मध्ये प्रकाशित झाले होते. संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते तसेच शिवसेना पक्षाचे मुखपत्र 'सामना'चे कार्यकारी संपादक आहेत. गेल्या काही काळापासून संजय राऊत यांच्यावर शिवसेनेत अनेक जबाबदाऱ्या असून, पक्षाच्या सर्व निर्णयांमध्ये त्यांच्या बोलण्याला आणि मताला स्थान आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेचा शिवसेनेचा निर्णय असो की भाजपपासून वेगळे होण्याची चर्चा असो, शिवसेनेत सर्वत्र राऊतांचे वर्चस्व दिसून येते.
जन्म आणि शिक्षण : संजय राऊत यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९६१ रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. राजाराम राऊत आणि सविता राजाराम राऊत हे त्यांचे आई-वडील. त्यांचे धाकटे भाऊ सुनील राऊत हे देखील आमदार असून शिवसेनेत सक्रिय आहेत. राऊत यांनी मुंबईतील वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलर ऑफ कॉमर्स (Sanjay Raut Birthday) केले.
संजय राऊत यांची कारकीर्द : संजय राऊत यांची कारकीर्द पत्रकार म्हणून सुरू झाली. राऊत हे अंडरवर्ल्ड रिपोर्टिंगमध्ये तज्ज्ञ मानले जात होते आणि आजही मानले जातात. राऊत यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात लोकप्रभा मासिकातून केली. दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अंडरवर्ल्डवरील त्यांच्या रिपोर्ट्सची मुंबईत मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायची. त्यामुळे पत्रकारिता विश्वात राऊत यांचे नाव वाढतच गेले आणि ते हळूहळू बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेसमोर (MP Sanjay Raut) आले.
बाळासाहेबांनी दिली ऑफर : पत्रकार म्हणून संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या नजरेत स्वत:साठी एक खास स्थान मिळवले. त्यानंतर त्यांच्या मातोश्रीवर फेऱ्या वाढल्या. दरम्यान, शिवसेनाप्रमुखांनी केवळ २९ वर्षीय राऊत यांना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे कार्यकारी संपादक बनण्याची ऑफर दिली. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांची ही ऑफर राऊत नाकारू शकले नाहीत आणि गेली 30 वर्षे ते 'सामना'चे कार्यकारी संपादक आहेत.
राऊत विरुद्ध भाजपा : संजय राऊत हे भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेदाचे सूत्रधार असल्याचे बोलल जात. खरे तर 2019 मध्ये शिवसेनेने भाजपवर आश्वासने न पाळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून संजय राऊत हे भाजपच्या बाजूचा काटा राहिले आहेत. याचे कारण स्पष्ट आहे, कारण भाजपकडून सत्तेचे सिंहासन हिसकावून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती म्हणजे संजय राऊत. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या सूचना आणि शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याचा वापर केला असे बोलले जाते.