ETV Bharat / state

मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावं, संभाजीराजेंचा सल्ला

खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती घराण्याच्या वतीने मंत्र्यांना एक सल्ला दिला आहे. मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन मदत पोहोचवावी असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

संभाजीराजेंचा मंत्र्यांना सल्ला
author img

By

Published : Aug 21, 2019, 8:02 PM IST

मुंबई - खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती घराण्याच्या वतीने मंत्र्यांना एक सल्ला दिला आहे. मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन मदत पोहोचवावी. कोल्हापूर, सांगली तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासीयांची सुद्धा हीच स्पष्ट भावना असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. राज्यातील सर्वच स्तरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे होत आहे. याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत भीक मागून मदत गोळा केली होती. यावर संभाजीराजे यांनी 'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? असे वक्तव्य करत त्यांनी विनोद तावडेंबद्दल संताप व्यक्त केला होता.

यावर तावडे म्हणाले, की रिक्षावाले, फेरीवाले, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजीराजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला असल्याचे तावडे म्हणाले होते.

यावर आज पुन्हा संभाजीराजेंनी ट्वीट करून उत्तर दिले आहे. त्यांनी ‘छत्रपती घराण्याच्या वतीने एकच सल्ला, लोकनियुक्त सरकारच्या मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावं आणि लोकांमध्ये जाऊन मदत पोहोचवावी. कोल्हापूर सांगली तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासीयांची सुद्धा हीच स्पष्ट भावना आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.