ETV Bharat / state

MP Rahul Shewale : माफी मागा, अन्यथा मुंबईत पाय ठेवू देणार नाही - खा. राहुल शेवाळे यांचा राहुल गांधींना इशारा - राहुल गांधी यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक विधानाबाबत (statement regarding freedom fighter Savarkar) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा लोकसभा शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale has warned Congress leader Rahul Gandhis) यांनी दिला.

MP Rahul Shewale
खा. राहुल शेवाळे यांचा राहुल गांधींना इशारा
author img

By

Published : Nov 19, 2022, 5:00 PM IST

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक विधानाबाबत (statement regarding freedom fighter Savarkar) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा लोकसभा शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale has warned Congress leader Rahul Gandhis) यांनी दिला. आज स्वा. सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल शिवाजी पार्क येथील, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ राहुल गांधी यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन (Jode Maro Aandolan) करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना खासदार राहुल शेवाळे

सावरकरांचे नातू आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्यासह, शालेय मंत्री दीपकजी केसरकर, आमदार सदा सरवणकर, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, विभागप्रमुख गिरीश धानुरकर, महिला विभाग संघटिका प्रिया गुरव यांसह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

खासदार राहुल शेवाळे आणि रणजित सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, शनिवारी शिवाजी पार्क येथे काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून, त्यांच्या विधानाचा निषेध केला. 'सावरकरजी के सन्मान में, शिवसेना मैदान में' अशा घोषणांनी उपस्थितांनी
परिसर दणाणून सोडला.

काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनीही काही वर्षांपूर्वी स्वा. सावरकर यांचा अवमान केला होता, तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले होते. त्यांच पद्धतीने आज आम्ही देखील हे जोडे मारो आंदोलन करून राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला. या विधानाबाबत माफी मागितल्या शिवाय त्यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही. तसेच अडीच वर्षांत महविकास आघाडी सरकारने कॅबिनेट मध्ये, स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का केली नाही? खासदार संजय राऊत यांनी देखील संसदेत ही मागणी का लावून धरली नाही? त्यांना खरंच सावरकरांविषयी आदर असेल तर त्यांनी त्वरित महविकास आघाडीतून बाहेर पडायला हवे, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वरतीही त्यांनी टीका केली. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना चांगला सल्ला द्यावा, असा चिमटा देखील शेवाळे यांनी यावेळी काढला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.