ETV Bharat / state

'मुंबईतील कोव्हिड योद्ध्यांना आपल्या हद्दीत बंदी करण्याचा इतर महानगरपलिकांचा निर्णय दुर्दैवी'

मुंबईला कोरोनापासूम वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे कोव्हिड योद्धा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान असल्याचे मत खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले आहे.

'मुंबईतील कोव्हिड योद्ध्यांना आपल्या हद्दीत बंदी करण्याचा इतर महानगरपलिकांचा निर्णय दुर्देवी'

author img

By

Published : May 6, 2020, 5:59 PM IST

मुंबई - महानगरपालिका हद्दीत अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे काम करणाऱ्या 'कोव्हिड योद्ध्यां'ना आपल्या हद्दीत बंदी करण्याचा इतर महानगरपलिकांचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि बेजबाबदार असल्याची टीका खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित महानगरपालिकांना समज देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली.

'मुंबईतील कोव्हिड योद्ध्यांना आपल्या हद्दीत बंदी करण्याचा इतर महानगरपलिकांचा निर्णय दुर्दैवी'

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) राहणारे अनेक डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, पत्रकार आणि इतर अत्यावश्यक सुविधा देणारे 'कोविड योद्धा' मुंबईला कोरोनापासून वाचविण्यासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. या योद्ध्यांच्या कार्याची दखल घेण्याऐवजी, त्यांच्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या परिसरात होतो आहे, अशी भावना मुंबई नजीकच्या काही महानगरपलिकांची आहे. यामुळेच त्यांनी मुंबईत अत्यावश्यक कार्यासाठी जाणारे डॉक्टर्स, पोलीस आणि इतरांच्या राहण्याची सोय, मुंबई महानगरपालिकेने मुंबईतच करावी, असा आततायी निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे, मुंबईला कोरोनापासूम वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे कोव्हिड योद्धा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान असल्याचे मत, खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.