मुंबई : खासदार गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश केला ( Gajanan Kirtikar entry into Shinde group ) आहे. दरम्यान, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालण्यासाठी शिंदेना पाठिंबा देत असल्याचे खासदार गजानन किर्तीकर म्हणाले. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात हा पक्ष प्रवेश करण्यात ( Rabindra Natya Mandir ) आला. रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते. तर दुसरीकडे कीर्तिकरांनी शिंदेना पाठिंबा देताच, त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली.
विशेष मेळाव्याचे आयोजन : मुंबईतील दादर माहीम परिसरातील विभाग क्रमांक १० च्या वतीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात जनतेच्या साक्षीने महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. तर कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे अमोल म्हणाले.
गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी : शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली ( Gajanan Kirtikar extrusion Thackeray group ) आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.