ETV Bharat / state

ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितला सिग्नलवरील धक्कादायक अनुभव - खासदार अमोल कोल्हे

Amol Kolhe : वाहतूक सिग्नलवर पोलिसांच्या वसुलीचा अनेकांना अनुभव आला असेलच. आता याचा अनुभव स्वतः राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनाही आलाय. पोलिसांच्या वसुलीची थेट आकडेवारीच अमोल कोल्हे यांनी समोर आणली आहे. मुंबईच्या सिग्नलवर आलेला एक धक्कादायक अनुभव कोल्हे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत शेअर केलाय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 3:33 PM IST

Updated : Dec 2, 2023, 5:50 PM IST

मुंबई Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे. पोलिसांना प्रत्येक चौकात वसुलीसाठी टार्गेट ठरवून देण्यात येत असल्याचा दावा अमोल कोल्हे (Amol Kolhe on Triple Engine) यांनी केलाय. मुंबईतील प्रत्येक चौकात 25 हजार रुपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असं वाहतूक पोलीस (Traffic Police) कर्मचारी यांना टार्गेट देण्यात आल्याचं कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच कोल्हे यांनी राज्य सरकारला काही प्रश्न विचारत टीकाही केली आहे.

  • आजचा धक्कादायक अनुभव-

    मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!… pic.twitter.com/TJ3oq2oSsO

    — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हिडिओत खासदार कोल्हे काय म्हणाले : खासदार कोल्हे यांनी आरोप करताना व्हिडिओत म्हटले आहे की,, आपण मुंबईतून जात असताना एका चौकात एका महिला पोलीस भगिनीने आपल्याला अडवले. तसेच काहीतरी कारण सांगून ड्रायव्हरला दंड भरण्यास सांगितले. याबाबत आपण सदर महिला पोलिसाला विचारले असता त्यांनी आपल्याला ओळखल्यानंतर वरिष्ठांकडून आलेला मेसेज दाखवला. प्रत्येक चौकामध्ये पंचवीस हजार रुपये दंड वसूल झालाच पाहिजे, अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आल्याचं त्या महिला पोलीस भगिनीने सांगितले. तो मेसेज पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसला. एका चौकात जर पंचवीस हजार रुपये वसुलीचे निर्देश असतील तर प्रत्येक चौकातील वसुली पाहता किती रुपये हे सरकार वाहनधारकांकडून घेणार आहे? याचा अंदाज येईल. सदर महिला पोलीस भगिनीचे आपण नाव अथवा तिची ओळख उघड करणार नाही. मात्र, या घटनेने आपल्याला धक्का बसला असून सरकारने सर्वसामान्य जनतेची लूट थांबवावी. तसेच याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही खासदार कोल्हे यांनी केली आहे.

अमोल कोल्हे यांची पोस्ट :

आजचा धक्कादायक अनुभव-

मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!

मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय?

संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल!

ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली???

कोल्हेंची सरकारवर टीका : वरील पोस्ट खासदार अमोल कोल्हे यांनी शेयर केली आहे. तसेच या पोस्टमधून त्यांनी राज्य सरकारलाही काही प्रश्न विचारले आहेत. ट्रॅफिकच्या नावाखाली फक्त मुंबईत कोट्यवधींची वसुली होते तर इतर शहरातील काय? असा प्रश्न कोल्हे यांनी सरकारला विचारलाय. तसेच हे सरकार ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? असं म्हणत टीकाही केली आहे.

हेही वाचा -

  1. अजित पवारांच्या आव्हानानंतर शरद पवार उद्या बालेकिल्ल्यात; टीकेला उत्तर देणार?
  2. 'आम्ही एसीमध्ये बसून भाषण करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन समस्या जाणून घेतो', अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर
  3. मराठा आंदोलकांचा विरोध; अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द होण्यामागचं खरं कारण काय?

Last Updated : Dec 2, 2023, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.