ETV Bharat / state

शेकाप, रिपब्लिकन आणि रासप या छोट्या पक्षांचे लोकसभेतील अस्तित्व संपले?

या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या राजकारणाचा मोठा फटका या छोट्या पक्षांना बसला आहे.

author img

By

Published : Mar 29, 2019, 10:01 AM IST

Updated : Mar 29, 2019, 10:19 AM IST

महाराष्ट्रातील छोट्या राजकीय पक्षांचे नेते

मुंबई - पहिल्या लोकसभेपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आघाडीने एकही जागा दिली नाही. यामुळे या पक्षाचे अस्तित्व लोकसभेत उरणार नाही. तसेच, रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ही या निवडणुकीत नसल्याने राज्यातल्या छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आतापर्यंत या पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत हे पक्ष रिंगणातून हद्दपार झाले आहेत.

या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या राजकारणाचा मोठा फटका या छोट्या पक्षांना बसला आहे. भाजप आणि शिवसेना युतीने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन युतीला तर महाघाडीने अन्य रिपब्लिकन पक्षांना संधी दिली नाही. तसेच, शेतकरी कामगार पक्ष आघाडीत सामील होऊनही त्यांना एकही जागा देण्यात आलेली नाही.

लोकसभेतील या छोट्या राजकीय पक्षांचा आलेख

शेतकरी कामगार पक्ष

- शेकाप १९५२ पासून निवडणूक लढवत आहे. मात्र, कालांतराने पक्षाला उतरती कळा लागली. राज्यात रायगड आणि सोलापुरातील सांगोला विधानसभा मतदार संघात पक्षाला जनाधार आहे. मागील निवडणुकीत रायगड आणि सिंधुदुर्ग मतदार संघात निवडणूक लढवली होती. एकेकाळी शेकापने कुलाबा मतदार संघातून राजाराम राऊत, दिनकर पाटील आणि रामशेठ ठाकूर यांना संसदेत पाठवले होते.

रिपब्लिकन पक्ष ( आठवले)

रामदास आठवले हे १९९६ पासून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांना १९९८ मध्ये दक्षिण मध्य मुंबईतून विजय मिळाला होता. काँग्रेसच्या पाठिंब्यावर १९९९ आणि २००४ ची निवडणूक पंढरपूरमधून लढवली आणि विजयी झाले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीत त्यांचा पराभव झाला. २०१४ साली सातारामधून पक्षाने निवडणूक लढवली. मात्र, यंदा युतीने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जागा दिली नाही.

राष्ट्रीय समाज पक्ष

- महादेव जानकर हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपसोबत आहेत. २००९ मध्ये माढातून थेट जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी टक्कर घेतली. २०१४ला जानकरांनी बारामतीमधून लोकसभा लढवली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना

- २००९ आणि २०१४ मध्ये तत्कालीन इचलकरंजी आणि हातकणंगले मधून लोकसभा निवडणुक लढवली आणि विजयी झाले. २०१९ मध्ये भाजपशी युती तोडून ते आघाडीसोबत गेले आहेत. यावेळी पक्ष सांगली आणि हातकणंगले जागा लढवणार आहे. स्वाभिमानीतून विभक्त होत सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना काढली. मात्र, त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही.

Intro:सूचना- या बातमीसाठी शिवसेना भाजप युतीच्या कोल्हापूर सभेचे शॉट्स तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पत्रकार परिषदेचे शॉट्स वापरता येतील.. रायगड येथून भोसतेकर शेकापच्या जयंत पाटील यांचा बीट पाठवत आहेत..( विशेष बातमी)

शेकाप, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांचे अस्तित्व या लोकसभेत संपले? केवळ स्वाभिमानी मैदानात

मुंबई 28

अगदी पहिल्या लोकसभेपासून गेल्या निवडणुकांपर्यंत लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व या लोकसभेत उरणार नाही. तसेच रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ही या निवडणुकीत नसल्याने राज्यातल्या छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता पर्यंत या पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवल्या होत्या ,मात्र या निवडणुकीत हे पक्ष निवडणुकीच्या मैदानातून हद्द पार झाले आहेत.

या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या राजकारणाचा मोठा फटका या छोट्या पक्षांना बसला आहे. भाजप आणि शिवसेना युतीने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन युतीला तर महाघाडीने अन्य रिपब्लिकन पक्षांना संधी दिली नाही. तसेच शेतकरी कामगार पक्ष आघाडीत सामील होऊनही त्यांना एकही जागा देण्यात आलेली नाही.

छोट्या राजकीय पक्षांचा लोकसभेचा आलेख

शेतकरी कामगार पक्ष - 1952 पासून निवडणूक लढवत आहे. पण कालांतराने पक्षाला उतरती कळा लागली. राज्यात रायगड आणि सोलापुरातील सांगोला विधानसभा मतदार संघात जनाधार
* एकेकाळी शेकापने कुलाबा मतदार संघातून
राजाराम राऊत, दिनकर पाटील आणि रामशेठ ठाकूर यांना संसदेत पाठवले होते.
* गेल्या 2014 निवडणुकीत रायगड आणि सिंधुदुर्ग मतदार संघात निवडणूक लढवली.

रिपब्लिकन पक्ष ( आठवले)

* रामदास आठवले हे १९९६ पासून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

* १९९८ मध्ये दक्षिणमध्य मुंबईतून विजयी

* १९९९ आणि २००४ ची निवडणूक पंढरपूरमधून लढवली.

*२००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीत पराभव.

*2014 साली सातारा मधून पक्षाने निवडणूक लढवली.

* 2019 लोकसभेत उमेदवारी नाही.

राष्ट्रीय समाज पक्ष- महादेव जानकर

* महादेव जानकर हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपसोबत आहेत.
* २००९ मध्ये माढातून थेट जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी टक्कर घेतली.

*2014 जानकर यांनी बारामती मधून लोकसभा लढवली.

* स्वाभिमानी शेतकरी संघटना

* 2009 आणि 2014 मध्ये तत्कालीन इचलकरंजी आणि हातकणंगले मधून लोकसभेत विजयी

* 2019 मध्ये भाजपशी फारकत सांगली आणि हातकणंगले जागा लढवणार

* स्वाभिमानीतुन विभक्त होत सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना काढली,पण उमेदवारी नाही. Body:.....Conclusion:
Last Updated : Mar 29, 2019, 10:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.