मुंबई - कोरोना व्हायरसने राज्यात थैमान घातले आहे. या व्हायरसचा प्रसार कमी होण्यासाठी महाराष्ट्रातील जेल प्रशासनाने तब्बल ३ हजार ४७८ कैद्यांना जामीनावर सोडण्यात आले आहे. सात वर्षापेक्षा कमी शिक्षा भोगत असलेले हे सर्व कैदी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याबरोबरच मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील पाच केंद्रीय कारागृह लॉकडाऊन करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे या पाच कारागृहात यापुढे एकही नवीन कैदी येणार नाही व यातील दुसरे कैदी तसेच अधिकारीही बाहेर जाणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.