मुंबई - आज (दि. १७ जाने.) राज्यात ३ हजार ८१ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९ लाख ९० हजार ७५९ वर पोहोचला आहे. राज्यात आज (रविवार) ५० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ५० हजार ४३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे. राज्यात आज (रविवार) एकूण ५२ हजार ६५३ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७६ टक्के
राज्यात आज (रविवार) २ हजार ३४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८ लाख ८६ हजार ४६९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३८ लाख ६ हजार ३८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ९० हजार ७५९ नमुने म्हणजेच १४.४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख २५ हजार ३०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५२ हजार ६५३ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - पोलिसांचा गणवेश बदलण्याच्या मागणीचा विचार करू - गृहमंत्री