मुंबई - राज्यात शनिवारी (दि. 19 डिसें.) 3 हजार 940 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 लाख 92 हजार 707 वर पोहोचला आहे. राज्यात आज 74 कोरोना बाधितांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 48 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.57 टक्के इतका आहे. राज्यात सध्या एकूण 61 हजार 95 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.14 टक्के
राज्यात आज (शनिवार) 3 हजार 119 रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण 17 लाख 81 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.14 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज (दि. 19 डिसें.) 74 कोरोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 20 लाख 59 हजार 235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 92 हजार 707 नमुने म्हणजेच 15.74 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 360 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण 61 हजार 95 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कधी किती रुग्ण आढळून आले
राज्यात जून दरम्यान दिवसाला 5 हजार 400 रुग्ण आढळून येत होते. टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या 10 हजार 500 वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या 20 हजार 400 वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या 24 हजार 800 वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या मागील काही दिवसांत कमी होत आहे. राज्यात 12 ऑक्टोबरला 7 हजार 89 रुग्ण, 13ऑक्टोबरला 8 हजार 522 रुग्ण आढळून आले होते. 18 ऑक्टोबरला 5 हजार 984 रुग्णांची, 26 ऑक्टोबरला 3 हजार 645, 7 नोव्हेंबरला 3 हजार 959, 10 नोव्हेंबरला 3 हजार 791, 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 16 नोव्हेंबरला 2 हजार 535, 17 नोव्हेंबरला 2 हजार 840, 20 नोव्हेंबरला 5 हजार 640, तर 21 नोव्हेंबरला 5 हजार 760 रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - सोनिया गांधी यांच्या पत्राबाबद्दल माहिती नाही, पण सरकार योग्य काम करतंय - नवाब मलिक
हेही वाचा - कांजूरमार्गलाच होणार मेट्रो कारशेड, भरसभेत संजय राऊत यांचा पुनर्उच्चार