मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज (दि. 6 मार्च) मुंबईत 37 हजार 309 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 3 लाख 50 हजार 84 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत आज शनिवारी 37 हजार 309 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 31 हजार 629 लाभार्थ्यांना पहिला तर 5 हजार 680 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 3 लाख 50 हजार 84 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 3 लाख 7 हजार 296 लाभार्थ्यांना पहिला तर 42 हजार 788 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 1 लाख 56 हजार 605 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 8 हजार 933 फ्रंटलाईन वर्कर, 76 हजार 363 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 8 हजार 183 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
महापालिकेतील लसीकरण
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज (दि. 6 मार्च) 20 हजार 425 लाभार्थ्यांना पहिला तर 4 हजार 706 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 25 हजार 131 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रात 2 लाख 73 हजार 478 लाभार्थ्यांना पहिला तर 39 हजार 100 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 3 लाख 12 हजार 578 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
सरकारी रुग्णालयातील लसीकरण
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 1 हजार 224 लाभार्थ्यांना पहिला तर 120 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 हजार 344 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 8 हजार 315 लाभार्थ्यांना पहिला तर 782 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 9 हजार 97 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा - मुंबईत आज 1 हजार 188 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू
खासगी रुग्णालयातील लसीकरण
खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील आज 9 हजार 980 लाभार्थ्यांना पहिला तर 854 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 10 हजार 834 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 25 हजार 503 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 906 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 28 हजार 409 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
आतापर्यंतचे लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 1 लाख 56 हजार 605
फ्रन्टलाईन वर्कर - 1 लाख 8 हजार 933
जेष्ठ नागरिक - 76 हजार 363
45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार - 8 हजार 183
एकूण - 3 लाख 50 हजार 84
हेही वाचा - गुन्हेगारांना संरक्षण देणारे सरकार चंद्रकांत पाटील यांचा सरकारवर घणाघात
हेही वाचा - मुकेश अंबानी प्रकरणाचा तपास सचिन वझे यांच्याकडे नाही - गृहमंत्री अनिल देशमुख