मुंबई - कोरोना व टाळेबंदीचा फटका बसला असताना ही 2020 मध्ये मुंबई आणि राज्यात घरविक्री मोठे विक्रम केले. मुद्रांक शुल्क दरात झालेली कपात हा या मागचे मुख्य कारण ठरले. पण, नव्या वर्षात मात्र नोव्हेंबर-डिसेंबर 2020 च्या तुलनेत मुंबई आणि राज्यात घरविक्रीत थोडी घट झाली आहे. त्यानुसार जानेवारीनंतर आता फेब्रुवारीत घरविक्रीचा आकडा 11 हजारांचा आकडा पार करू शकला नाही. फेब्रुवारीच्या 26 दिवसांत मुंबईत 10 हजार 172 घरे विकली गेली असून यातून राज्याला 352 कोटींचा महसूल मिळाला आहे.
डिसेंबर 2020 मध्ये 19 हजार 581 हजार घरांची विक्री
घरविक्रीच्या दृष्टीने डिसेंबर, 2020 हा महिना सर्वात महत्वाचा ठरला. कारण या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक अशी घरविक्री झाली. 19 हजार 581 घरे डिसेंबर 2020 मध्ये विकली गेली होती. तर यातून 680 कोटी महसूल मिळाला होता. तर राज्यात ही विक्रमी 2 लाख 55 हजार 510 कोटी इतका महसूल मिळाला होता. 2020 मध्ये कोरोना आणि टाळेबंदीचा मोठा फटका बांधकाम व्यवसायाला आणि मालमत्ता बाजारपेठेतील व्यवहारांना बसला होता. एप्रिलमध्ये तर मुंबई एक ही दस्तऐवज नोंदवले गेले नव्हते. म्हणजे एकही घर विकले गेले नव्हते. तर राज्यात केवळ 771 घरे विकली गेली होती. त्यामुळे 2020 मध्ये मालमत्ता बाजारपेठेत चिंता होती. पण, सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान 2020 मधील सगळी तूट भरून काढत विक्रमी घरविक्री झाली तर राज्य सरकारला चांगला महसूलही मिळाला. आता 2021 मध्ये मात्र घरविक्री थोडी घटली आहे.
राज्यात 1 लाख 50 हजार 832 घरांची विक्री
ऑगस्ट 2020 मध्ये राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात 2 आणि 3 टक्क्यांची कपात लागू केली. याचा परिणाम म्हणूनच डिसेंबर 2020 मध्ये रेकॉर्ड ब्रेक घरविक्री झाली. 1 जानेवारी, 2021 पासून मात्र मुद्रांक शुल्क दर एक टक्क्यांनी वाढले आहेत. म्हणजेच जिथे डिसेंबरमध्ये 2 आणि 3 टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. तिथे आता जानेवारीपासून 3 आणि 4 टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे 2021 मध्ये घरविक्री काहीशी कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण, मागील काही वर्षांतील घरविक्री लक्षात घेता ही घरविक्री बरी असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार फेब्रुवारी झालेली 10 हजार 171 घरांची विक्री चांगली मानली जात आहे. दरम्यान राज्यात
फेब्रुवारीच्या 26 दिवसात (27 आणि 28 फेब्रुवारीला शनिवार-रविवार आल्याने व्यवहार बंद) 1 लाख 50 हजार 1 लाख 50 हजार 832 घरे विकली गेली आहेत. जेव्हा की जानेवारीत हा आकडा 1 लाख 52 हजार 216 असा होता. म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीत मुंबई आणि राज्यात तशी एक समान घरविक्री झाली आहे असे दिसून येत आहे. दरम्यान राज्यातील घरविक्रीतून राज्य सरकारला 1 हजार 282 कोटी महसुल मिळाला आहे. आता मार्चमध्ये घरविक्री कशी राहील हे पाहणे महत्वाचे आहे. कारण 31 मार्चपर्यंतच मुद्रांक शुल्क कपात लागू आहे. म्हणजेच 1 एप्रिलपासून राज्यात सर्वत्र 5 टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. तेव्हा मार्चमध्ये मुद्रांक शुल्क कपातीचा लाभ घेत मोठ्या संख्येने घरविक्री होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. ही आशा खरी ठरते का हे 31 मार्चलाच कळेल.
हेही वाचा - सावरकरांच्या 'त्या' मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार