मुंबई - मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज (दि. 25 मार्च) मुंबईत 34 हजार 495 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 10 लाख 08 हजार 323 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत आज (दि. 25 मार्च) 34 हजार 495 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 31 हजार 400 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 95 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 10 लाख 08 हजार 323 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 8 लाख 71 हजार 398 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 36 हजार 925 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 31 हजार 899 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 20 हजार 295 फ्रंटलाईन वर्कर, 4 लाख 77 हजार 507 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 78 हजार 622 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज (दि. 25 मार्च) 20 हजार 236 तर आतापर्यंत 7 लाख 07 हजार 474 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 3 हजार 330 लाभार्थ्यांना तर एकूण 46 हजार 543 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 10 हजार 929 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 2 लाख 54 हजार 306 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी | 2 लाख 31 हजार 899 |
फ्रंटलाईन वर्कर | 2 लाख 20 हजार 295 |
ज्येष्ठ नागरिक | 4 लाख 77 हजार 507 |
45 ते 59 वय | 78 हजार 622 |
एकूण | 10 लाख 8 हजार 323 |
हेही वाचा - काही पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या, त्यांच्यावर कारवाई होणारच - अजित पवार