मुंबई - मंगळवारी (दि. १३ जुलै) ७ हजार २४४ नवे रुग्ण आढळून आले असून १० हजार ९७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या १ लाख ४ हजार ४०६ सक्रिय रुग्ण असून मृत्यू तर २.०४ टक्क्यावर स्थिरावला आहे.
राज्याची आकडेवारी
कोरोनामुळे गेल्या २४ तासांत १९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने राज्यात १ लाख २६ हजार २२० रुग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ टक्के आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. दिवसभरात ७ हजार २४३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १० हजार ९७८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ५९ लाख ३८ हजार ७४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ टक्के एवढे आहे. आजपर्यंत कोरोनाच्या ४ कोटी ४३ लाख ८३ हजार ११३ चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ७२ हजार ६४५ (१३.९१ टक्के) रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७४ हजार ४६३ व्यक्ती होम क्वारंटाइन तर ४ हजार ६०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १ लाख ४ हजार ४०६ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
या जिल्ह्यात रुग्ण संख्या अधिक
मुंबई - ४५४
रायगड - ३५१
अहमदनगर - ५७५
पुणे - ४२८
पुणे पालिका - २५३
सोलापूर - ४१२
सातारा - ७७७
कोल्हापूर - ७०४
कोल्हापूर पालिका - २८६
सांगली - ९००
रत्नागिरी - २८३
हेही वाचा - झोटिंग समितीच्या अहवाल गहाळ, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार