ETV Bharat / state

राज्यात 7 हजार 539 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 16 हजार 177 बाधित बरे

author img

By

Published : Oct 22, 2020, 8:44 PM IST

राज्यात आज (22 ऑक्टोबर) 7 हजार 539 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 16 लाख 25 हजार 197 वर पोहोचला आहे.

edited photo
संपादित छायाचित्र

मुंबई - राज्यात आज (22 ऑक्टोबर) 7 हजार 539 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 16 लाख 25 हजार 197वर पोहोचला आहे. तसेच आज 16 हजार 177 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या 14 लाख 31 हजार 856वर पोहोचला आहे.

सध्या 1 लाख 50 हजार 11 सक्रिय रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. आज (गुरुवार) राज्यात 198 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत 42 हजर 831 बाधित रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.1 टक्क्यांवर पोहोचले आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 84 लाख 2 हजार 559 नमुन्यांपैकी 16 लाख 25 हजार 197 नमुने पॉझिटिव्ह (19.34 टक्के) आले आहेत. राज्यात 24 लाख 59 हजार 436 लोक गृह विलगीकरणात आहेत तर 24 हजार 621 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आतापर्यंत 42 हजार 631 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे.

हेही वाचा - 'बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय?'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.