ETV Bharat / state

केंद्राकडून बुलेट ट्रेनचा लाड; अर्थसंकल्पातून 7 हजार काेटींची भरीव तरतूद - नागपूर- मुंबई बुलेट ट्रेन

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पमध्ये तब्बल 7 हजार 897 काेटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पास आणखी गतीने चालना मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद या सोबत मुंबई- नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेनच्या कामालाही गती मिळणार आहे.

केंद्राकडून बुलेट ट्रेनचा लाड
केंद्राकडून बुलेट ट्रेनचा लाड
author img

By

Published : Feb 5, 2021, 3:41 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पमध्ये तब्बल 7 हजार 897 काेटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पास आणखी गतीने चालना मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई-नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेनच्या युटिलिटी शिफ्टिंग आणि एअर सर्वेक्षणाच्या कामासाठी नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशन लिमिटेड( एनएचएसआरसीएल)कडून निविदा काढण्यात आली होती. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद या सोबत मुंबई- नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेनच्या कामालाही गती मिळणार आहे.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा कामाला मिळणार गती-

नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशन लिमिटेडकडून गेल्या वर्षी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या मार्गावरील अभ्यास आणि सर्वेक्षणासाठी सप्टेंबर 2020 मध्ये निविदा काढण्यात आलेली होती. आता ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यात एअर सर्वेक्षण केल्यानंतर युटिलिटी शिफ्टिंगचे काम केले जाणार आहे. ज्यात बुलेट ट्रेन मार्गावरील हायटेंशन केबल, पाईपलाईन सारख्या अनेक वस्तूंच्या शिफ्टिंग बद्दलचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे 2021-22 या आर्थिक वर्षांत मुंबई-नागपूर बुलेटचा कामाला गती मिळणार असून पुढच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी केंद्राकडून भरीव तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनला अडचण-

केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला भरीव तरतूद तर केली आहे. पण महाराष्ट्रात भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. गुजरातमध्ये 94 टक्के, तर दादर, नगर हवेलीमध्ये 100 टक्के भूसंपादनाचे काम झाले आहे. खरी अडचण भूसंपादनाचा कामात महाराष्ट्रात येत आहे. आतापर्यंत पालघरमध्ये 13 टक्के आणि ठाणे जिल्ह्यात 44 टक्के असे एकूण 23 टक्के भूसंपादन झाले आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत सापडला आहे.

मुंबईकरांना बुलेट ट्रेन नको-

एकीकडे यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनकरिता 7 हजार 897 काेटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या एमयूटीपी प्रकल्पासाठी किरकोळ तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवासी संघटनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईकरांना बुलेट ट्रेनची गरज नसून सर्व सामान्य प्रवाशांना लोकल सेवा हवी आहे. अनेक एमयूटीपी 2, एमयूटीपी 3 आणि एमयूटीपी 3 (अ) चे अनेक प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडत जात आहे. हे पूर्ण करण्याऐवजी बुलेट ट्रेनचा लाड केंद्र सरकरकडून केला जात असल्याची प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.