ETV Bharat / state

राज्यात ८ हजार ५३५ नवे कोरोनाग्रस्त, १५६ रुग्णांचा मृत्यू - maharashtra covid news

राज्यात गेल्या २४ तासात १५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ८ हजार ५३५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ६ हजार १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १ लाख १६ हजार १६५ इतकी झाली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 11, 2021, 8:53 PM IST

Updated : Jul 11, 2021, 10:32 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या २४ तासात १५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ८ हजार ५३५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ६ हजार १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १ लाख १६ हजार १६५ इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यूदर शनिवारी (दि. १० जुलै) २.०४ टक्के इतका झाला होता. तो आज रविवारी स्थिर आहे.

राज्याची आकडेवारी

कोरोनामुळे गेल्या २४ तासांत १५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने राज्यात १ लाख २५ हजार ८७८ रुग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही ९६.०२ टक्के आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. दिवसभरात ८ हजार ५३५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६ हजार १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ५९ लाख १२ हजार ४७९ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे आहे. आजपर्यंत कोरोनाच्या ४ कोटी ४० लाख १० हजार ५५० चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ५७ हजार ७९९ (१३.९९ टक्के) रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ९६ हजार २७९ व्यक्ती होमक्वारंटाइन तर ४ हजार ७७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १ लाख १६ हजार १६५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण, मृत्यूंच्या संख्येत अपेक्षित घट नाही

राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णांच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यू याबाबतची आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून एका टप्प्यावर येऊन स्थिरावली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूंच्या प्रमाणात अपेक्षित घट होत नसल्याने आरोग्य विभागापुढील डोकेदुखी कायम असल्याचे दिसत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाट सुद्धा काळजी वाढवणारे विषय आहेत. यामुळे राज्यात कडक निर्बंध आजही लागू आहेत.

या जिल्ह्यात रुग्ण संख्या अधिक

मुंबई - ५५८

रायगड - ३४६

अहमदनगर - ४२९

पुणे - ५६५

पुणे पालिका - ३०५

सातारा - ७५५

कोल्हापूर - १ हजार १९३

सांगली - ९२७

रत्नागिरी - ४५५

हेही वाचा - आंदोलनात मुक्या जनावरांचा वापर करू नका, प्राणी संघटना आक्रमक

Last Updated : Jul 11, 2021, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.