ETV Bharat / state

Resident Doctors Strike : निवासी डॉक्टरांचा संप; रूग्णसेवेवर कमी अधिक प्रमाणात परिणाम... - संप

राज्यातील ७ हजार निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला (Resident Doctors Strike) आहे. या आंदोलनात पालिकेचे २ हजार निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. यामुळे पालिका रुग्णालयातील रुग्ण सेवेवर परिणाम (More or less affected on Patient care) होण्यास सुरुवात झाली आहे. ओपीडी सेवेवर आज दुसऱ्या दिवशीही परिणाम दिसून आला आहे. काही रुग्णांची ऑपरेशन पुढे ढकलण्यात आली आहेत. असे असले तरी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास झालेला दिसून आलेला नाही.

Resident Doctors Strike
निवासी डॉक्टर संप
author img

By

Published : Jan 3, 2023, 5:13 PM IST

मुंबई : देशात कोरोनाची लाटेची भीती ( Wake of Corona Infection ) वर्तवली जात असताना निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्यामुळे 2 जानेवारीपासून निवासी डॉक्टर संपावर (Resident Doctors Strike) आहेत. आधीच सर्वसामान्य आजार, हिवताप, मलेरिया, डेंग्यू इतर श्वसनाचे आजार ,गंभीर आजारांच्या महाराष्ट्रात समस्या आहेत. त्यात आता महामारी येण्याची शक्यता आहे आणि डॉक्टरांचा संपांमुळे शासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

डॉक्टरांचा संप : महागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, वसतीगृहाच्या समस्या, मुंबई महानगरपालिकेकडून दर महिना मिळणारा प्रलंबित कोविड भत्ता या कारणांमुळे राज्यभरात आज पासून सात हजार निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आदी रुग्णालयांमध्ये २ हजार डॉक्टर्स कार्यरत आहेत. या डॉक्टरांना कोविड काळातील भत्ता देण्यात आलेला नाही. हा भत्ता देण्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेला राज्य सरकार, पालिका प्रशासन, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी चर्चेला बोलावलेले नाही. यामुळे पालिका रुग्णालयातील २ हजार डॉक्टर काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. आज दुसऱ्या दिवशीही या डॉक्टरांनी आपला संप सुरूच ठेवला असून जो पर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा, इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

ऑपरेशन पुढे ढकलली : केईएम रुग्णालयात शकुंतला जयस्वाल या पायाला दुखापत झाल्याने १६ डिसेंबरपासून दाखल आहेत. सोमवारी त्यांच्या पायाचे ऑपरेशन होणार होते. डॉक्टरांच्या संपामुळे त्यांना बुधवारी ऑपरेशन होईल असे सांगण्यात आले आहे. बुधवारीही संप सुरु राहिल्यास ऑपरेशन आणखी पुढे ढकलले जाईल असेही सांगण्यात आले असल्याची माहिती त्यांचा मुलगा संतोष जयस्वाल यांनी दिली. अशीच परिस्थिती इतर रुग्णांची असल्याचे त्यांनी सांगितले.

परिणाम जाणवत नाही : मुंबई बाहेरून आलेल्या रतन आठवले यांचा मुलगा स्वराज हा डोक्याच्या ऑपरेशनमुळे वॉर्ड नंबर २ मध्ये १७ नोव्हेंबर पासून ऍडमिट आहे. वॉर्डमधून स्वराजला न्यूरो सर्जरी ओपीडीमध्ये दाखवण्यासाठी स्ट्रेचरवरून आणण्यात आले होते. ओपीडीमध्ये आणि वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार होत आहेत. डॉक्टरांच्या संपाचा मुलाच्या उपचारावर कोणताही असा परिणाम जाणवला नसल्याचे रतन आठवले यांनी सांगितले. केव्हीएस पांडे यांची आजी पायाचे ऑपरेशन झाल्याने रुग्णालयात दाखल आहे. त्यांचे टाके काढणे बाकी आहे. डॉक्टरांच्या संपामुळे मोठा परिणाम झालेला जाणवत नाही, मात्र कर्मचारी नर्स यांना रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागण्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.