ETV Bharat / state

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते जलमय; अनेक घरात घुसले पाणी - mumbai Heavy rain

मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात कांदिवलीच्या पूर्व भागातील हनुमान नगरमधील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले.

Monsoon 2021: Heavy rain in cities around Mumbai
Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते जलमय; अनेक घरात घुसले पाणी
author img

By

Published : Jul 18, 2021, 4:53 AM IST

मुंबई - शहरासह आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात कांदिवलीच्या पूर्व भागातील हनुमान नगरमधील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

मुंबई शहरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य मुंबईत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडी मुंबईने रात्री १२.३० वाजता चेतावणी दिली आहे. त्यानुसार, येत्या ३ तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांनी मुसळधार पावसाचा घेतला मनमुराद आनंद

किंग्ज सर्कल परिसरात आज पहाटेच्या सुमासास एक तरुणांचा ग्रुप पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळाला. या परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. या पाण्यात तरुण एकमेकांवर पाणी उडवत मस्ती करताना दिसले.

सायन रेल्वे ट्रॅक जलमय -

सायन परिसरात रात्रभरापासून मुसळधार पाऊस पडत असून सायन रेल्वे ट्रॅक जलमय झाला आहे. सायन रेल्वे ट्रॅकला तळ्याचे स्वरुप आले आहे.

उपग्रह चित्रात मुंबई, ठाण्यासह कोकणात ढगांनी गर्दी केली असून दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील ढग दिसत आहेत, अशी माहिती हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.

दरम्यान, मुंबईत पावसाचा असाच जोर राहिला तर रविवारी शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - सरकार स्थापनेचा देवेंद्र फडणवीसांचा दावा, भाजपकडे कोणते पर्याय उपलब्ध ?

हेही वाचा - महापालिका करणार अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांचे लसीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.