ETV Bharat / state

नो मराठी नो अ‍ॅमेझॉन...! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अ‍ॅमेझॉन विरुद्ध आता खळ्ळ-खट्याक

author img

By

Published : Dec 23, 2020, 1:33 PM IST

अ‌ॅमेझॉन व्यवस्थापनाच्या विरोधात मनसेने मोर्चा उघडला आहे. आहे. मनसे कार्यकर्त्यांनी 'तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी, मराठी नाही तर अ‌ॅमेझॉन नाही', अशी पोस्टरबाजी सुरू केली आहे. तसेच अॅमेझॉनच्या जाहिराती असणारे पोस्टरही काही ठिकाणी फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

No Marathi No Amazon
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अ‍ॅमेझॉन विरुद्ध आता खळ्ळ-खट्याक

मुंबई - अ‍ॅमेझॉन अॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सुरू केलेल्या मोहिमेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून संपूर्ण मुंबई शहरात आता अ‍ॅमेझॉन विरोधात फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. तसेच शहरातील अॅमेझॉनच्या जाहिरांतीचे फलक फाडत मनसेने आता अ‌ॅमेझॉन विरोधात खळ्ळ खट्याकचे धोरण अवंलबल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे.

अ‌ॅमेझॉन या ऑनलाईन खरेदी अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी मनसेकडून लावून धरण्यात आली आहे. यासाठी मनसेच्या वतीने गोरेगाव दिंडोशी परिसरात नो मराठी नो अ‌ॅमेझॉन असे फलक झळकवण्यात येत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता अ‍ॅमेझॉनकडून यावर काय तोडगा काढण्यात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी मनसेकडून अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.

मनसे अमेझॉनच्या विरोधात खळ्ळ खट्याक-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या विषयावर पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. ई-कॉमर्स कंपनीच्या अॅपमध्ये मराठीचा समावेश असावा, ही मागणी करत मनसे अ‌ॅमेझॉन विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अ‌ॅमेझॉनने मराठीला स्थान द्यावे, अशी मुख्य मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मात्र, अ‌ॅमेझॉन व्यवस्थापनने या मागणीला मान्य करण्यास तयार नसल्याने मनसेचे कार्यकर्ते अमेझॉन विरोधात आक्रमक झाले असून त्यांनी पोस्टरबाजीसह आता अ‌ॅमेझॉनच्या जाहिरात दर्शवणारे पोस्टर फाडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसेने आता अ‌ॅमेझॉनविरोधात खळ्ळ खट्याकची भूमिका स्वीकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिंडोशी येथील बसस्टॉपवरील अ‌ॅमेझॉनचे पोस्टर फाटलेले दिसून येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.