ETV Bharat / state

सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या; मनसेची मागणी - मनसे नेते बाळा नांदगावकर

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था विषाणूंवरील लसीचे संशोधन करण्यात अग्रणी आहे. संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांचे यासाठी मोठे योगदान आहे. तसेच, अनेक भयावह रोगांवर सीरमने लस उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे इतक्या वर्षांचे योगदान लक्षात घेता पुनावाला यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

MNS
मनसे
author img

By

Published : Dec 30, 2020, 10:36 PM IST

मुंबई - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था विषाणूंवरील लसीचे संशोधन करण्यात अग्रणी आहे. संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांचे यासाठी मोठे योगदान आहे. तसेच, अनेक भयावह रोगांवर सीरमने लस उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे इतक्या वर्षांचे योगदान लक्षात घेता पुनावाला यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

हेही वाचा - MPSC परीक्षा देण्याच्या मर्यादा निश्चित; जाणून घ्या कोणाला किती वेळा मिळणार संधी

सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमाने गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीतसुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचवणारे आहे. अशा भूषणावह कार्य करणाऱ्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ही विनंती, असे ट्विट नांदगावकर यांनी केले आहे.

कोण आहेत सायरस पुनावाला

पुण्यातील हडपसर परिसरात १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना सायरस पुनावाला यांनी केली. घोड्याच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लस निर्मितीसाठी केला जातो. त्यातूनच सायरस पुनावाला यांनी लस निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. ‘सीरम’ ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून सध्या पोलिओ, डायरीया, हेपिटायटस, स्वाईन फ्ल्यू, अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते.

हेही वाचा - राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवू नये - प्रकाश शेंडगे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.